आलिया भट्टने शेअर केले बालपणीचे फोटो : तिची आई...

आलिया भट्टने शेअर केले बालपणीचे फोटो : तिची आई सोनी राझदानने केले कौतुक (Adorable Alia Bhatt Shares Then-And-Now Beach Pictures : Mom Soni Razdan Says, Awww Baby)

आलिया भट्टच्या गोड व्यक्तीमत्त्वाचे सगळेच दिवाने आहेत. तिचा चाहतावर्ग खूप जास्त आहे. ती आत्ता देखील पूर्वीसारखीच गोड दिसते. तिने सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलं आणि तिचे बालपणीचे फोटो पाहिले की, ती तेव्हासारखीच आत्ताही निरागस असल्याची प्रचिती येते.

आता या पोस्टबद्दल बोलायचं तर, तिनं खूप दिवसांच्या अंतराने आपला खासगी फोटो शेअर केला आहे. कारण लोकांना मदत होईल अशा करोना संबंधित पोस्ट ती अलिकडे शेअर करत होती.

आलियाने आत्ताचे व लहानपणीचे फोटो प्रसिद्ध करून म्हटलं आहे – आपण कोण आहोत, याला कोणी महत्त्व देत नाही.

पिवळ्या रंगाचा फ्लोरल शॉर्ट व क्रॉप टॉप घालून आलिया समुद्रकिनारी बसली आहे, अन्‌ खूप गोड दिसते आहे.

आलियाच्या या फोटोवर रिध्दीमा कपूर (रणबीर कपूरची बहीण) आणि तिची आई सोनी राझदान यांनी छान कमेंट्‌स दिल्या आहेत. सोनी म्हणते – ऑ ऑ बेबी!  इतर मान्यवरांनी देखील हार्टचा इमोजी दिला आहे.

चाहत्यांना आलियाचे हे रुप खूप भावले आहे!

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘गंगूबाई काठियावाड’ या चित्रपटातील महत्त्वाकांक्षी भूमिकेत दिसणार आहे. अन्‌ ‘आरआरआर’ या चित्रपटात आहे.

आलियाने यापूर्वी देखील समुद्रकिनाऱ्यावरील आपली छायाचित्रे टाकून प्रशंसा मिळवली आहे. सर्व फोटो, सौजन्य – इन्स्टाग्राम