आदित्य नारायणची पत्नी श्वेता अग्रवालचे बेबी शॉव...

आदित्य नारायणची पत्नी श्वेता अग्रवालचे बेबी शॉवर, लवकरच बनणार आई-बाबा (Aditya Narayan Shares Pics From Shweta Agarwal’s Baby Shower)

इंडियन आयडल या कार्यक्रमाचा होस्ट व गायक आदित्य नारायणने सोशल मीडियावर आपली पत्नी श्वेता अग्रवालच्या बेबी शॉवर (ओटभरणीचे) फोटो शेअर केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच आदित्य नारायणसोबत श्वेताचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो आपण पाहिला. हा शेअर करून उभयतांनी आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती.  

लवबर्ड्‌स आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी पूर्णपणे तयार आहेत. आदित्यने श्वेता पोटुशी असल्याची बातमी दिल्यानंतर लगेचच तिच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून ते अतिशय आनंदी दिसत आहेत. वेगवेगळ्या पोझमधील फोटोंमध्ये दोघं खूपच क्युट दिसत आहेत.

श्वेताने आपल्या या बेबी शॉवरचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यांनी या फोटोंना ‘बेबी शॉवर’ अशी कॅप्शन दिली आहे. आदित्य आणि श्वेता त्यांच्या आयुष्यातील या नवीन क्षणाचा आनंद घेताना दिसताहेत.

आदित्य आणि श्वेताचे हे फोटो लगेचच व्हायरल होत असून दोघांचे सेलिब्रेटी फ्रेंड्‌स, चाहते आणि सहकलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. गायिका श्वेता पंडितने या फोटोंवर कमेंट करत ‘मी आत्या बनणार…’  असं लिहिलं आहे. तर सुगंधा मिश्रा आणि अर्जुन बिजलानी यांनी हार्टचे इमोजी पाठवले आहेत. एका चाहत्याने ‘लवकरच बेबी झा येणार आहे…’ असं म्हटलं आहे.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम