आदिल दुर्रानीने मान्य केले राखी सावंतसोबत झालेल...

आदिल दुर्रानीने मान्य केले राखी सावंतसोबत झालेले लग्न(Adil Durrani Finally Confirms Wedding With Rakhi Sawant, Says ‘Had To Handle Few Things So…)

राखी सावंतच्या लग्नाचे नाटक सोशल मीडियावर बरेच दिवस सुरू होते, आता ते नाटक संपले आहे. अखेर आदिल दुर्रानीने मौन तोडत राखी सावंतसोबतच्या लग्नाला दुजोरा दिला आहे. बिझनेसमन आदिलने त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच एक नोटही लिहिली आहे. त्यात आदिलने त्याच्या मौनामागची कारणे दिली आहेत.

ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचे लग्न सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. अभिनेत्रीने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र त्यावेळी राखी सावंतसोबतच्या लग्न झाल्याचे आदिलने फेटाळून लावल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. राखी आणि आदिलच्या या कथेत एक नवा ट्विस्ट आला आहे.

अखेर आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच एक नोट लिहून राखी सावंतसोबतचे लग्न स्वीकारले आहे.

गेल्या आठवड्यापासून राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांना हार घालताना आणि लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहेत. यातील एक फोटो या दोघांच्या निकाहनाम्याचा आहे, ज्यामध्ये राखीने स्वतःचे नाव राखी सावंत फातिमा ठेवले आहे.

राखीने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर आदिलने मौन पाळले होते. पण आता आदिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, त्यात त्याने राखीला पत्नी म्हणून स्वीकारले आहे. या फोटोत राखीने गुलाबी रंगाच्या फुलांची माळ घातली आहे. तर आदिल कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोसोबतच आदिलने राखीसोबतच्या लग्नाच्या प्रकरणावर इतके दिवस मौन बाळगण्याचे कारणही सांगितले आहे. आदिलने लिहिले – शेवटी, मी जाहीर करतो…राखी  मी तुझ्याशी लग्न केले नाही असे मी कधीही म्हटले नाही. फक्त काही गोष्टी हाताळायच्या होत्या त्यामुळे गप्प बसावे लागले. राखी (पप्पुडी) वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.