चाळीशीतल्या या अभिनेत्री, दिसतात २० वर्षांच्या ...

चाळीशीतल्या या अभिनेत्री, दिसतात २० वर्षांच्या (Actresses Who Look Younger Than Their Age)

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी वयाच्या मोहताज नाहीत. उलट चाळीशी उलटूनही त्यांचं सौंदर्य कमी न होता वाढलेलंच आहे. कुटुंबातील किशोरवयीन ते वृद्ध अशा सर्वच वयाच्या व्यक्ती त्यांच्या सौंदर्याच्या फॅन आहेत. पाहूया तर मग चाळीशीतही वीस वर्षांच्या वाटणाऱ्या या अभिनेत्री कोण आहेत?

मलायका अरोरा आजही सूपर हॉट आहे. तिचं वय वाढलेलं दिसतंच नाही. आजही ती तितकीच सुंदर व कमनीय दिसते, जेवढी ती २० वर्षांपूर्वी दिसत होती.

मलायकाचा खाली दिलेला फोटो पंधरा वर्षांपूर्वीचा आहे, जो मलायकाने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. बहिण अमृता बरोबरच्या या फोटोमध्येही मलायका मादक वाटत आहे.

हे तिचे हल्लीचेच फोटो आहेत, यातही मलायका अतिशय सुंदर आणि तरुण दिसत आहे.

सुष्मिता सेनचं सौंदर्य यूनिवर्सल आहे. तिच्या वय वाढतंय तसं तिचं सौंदर्य अधिकाधिक तेजाळत आहे. आपल्या फिटनेसबाबत ती अतिशय दक्ष राहते. १६ वर्षांची सुश्मिता आणि आता चाळीशी पार केलेली सुश्मिता पाहताना आता सुश्मिता अधिक ग्लॅमरस दिसू लागली आहे, हे नजरेतून सुटत नाही.

खाली दिलेले तिचे हे फोटो हल्लीचेच आहेत.

आपल्या टॅलेंटसाठी प्रसिद्ध असलेली काजोल सुरुवातीला सावळी दिसायची. पंरतु, आता ती अतिशय उजळलेली दिसते आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये काजोलचा सुरुवातीच्या चित्रपटातील फोटो आणि आताचा फोटो सोबत दिले आहेत, त्यात आपल्याला तिचा रंग उजळला असल्याचे स्पष्ट दिसते आहे. वाढत्या वयाचा तिच्या सौंदर्यावर काहीही परिणाम झालेला नसून ती आधीपेक्षा अधिकच सुंदर व तरुण दिसते आहे.

हे काजोलचे अलीकडचे फोटो आहेत.

चाळीशीनंतरही विश्वसुंदरी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची भूरळ लाखो चाहत्यांवर कायम आहे. आजही ती अतिशय तरुण आणि सुंदर दिसते. फोटोमध्ये तुम्ही हे पाहू शकता.

ऐशच्या हल्लीच्या फोटोंमधे ती आधीपेक्षाही अधिक सुंदर दिसत आहे.

करिश्मा कपूरला आकर्षक आणि नितळ त्वचा जन्मतःच वारशात मिळाली आहे. शिवाय तिच्या फिटनेसचाही त्यात हातभार आहे, ज्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते.

करिश्मा या अलिकडच्या फोटोंमध्ये भलतीच ग्लॅमरस दिसते आहे.