अभिनेत्री उर्मिला कोठारेचे तब्बल १२ वर्षांनी छो...

अभिनेत्री उर्मिला कोठारेचे तब्बल १२ वर्षांनी छोटया पडद्यावर पुनरागमन (Actress Urmila Kothare To Appear In A Serial After A Gap Of 12 Years)

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (पूर्वीची कानेटकर) हिचे तब्बल १२ वर्षानंतर, मालिकेतून पुनरागमन होत आहे. स्टार प्रवाहाच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिला पुन्हा छोटया पडद्यावर येत आहे.
या मालिकेत वैदेही असं ती साकारत असलेल्या पात्राचं नाव असून छोटया स्वराच्या आईची भूमिका ती करत आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेत आहे. मालिका निर्माणाधीन असून २ मे पासून स्टार प्रवाहवर प्रक्षेपित होईल.

आपल्या या भूमिकेविषयी उर्मिला म्हणते, “खूप वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे. या आधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रूपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी व आव्हानात्मक आहे.”