अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला जा...

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला जामीन, ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक (Actress Shraddha Kapoor’s Brother Siddhanth Kapoor Gets Bail After Being Arrested For Drug Consumption)

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला काल बंगळुरू येथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीत ड्रग्स घेतल्याप्रकरणी अटक झाली होती. आज त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे.

सिद्धांत कपूरसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. काल बंगळुरू येथील हॉटेल पार्कमध्ये आयोजित रेव पार्टीत त्याच्यासह आणखी काही जणांना ड्रग्स घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण आज सिद्धांतला जामीनावर सोडण्यात आले आहे. सिद्धांत कपूर हा एके काळचे बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांतची बहीण श्रद्धा कपूर सध्याची बॉलिवूडची आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते.

बंगळुरू येथे हॉटेल पार्कमध्ये सिद्धांतला डीजे म्हणून बोलवण्यात आले होते. त्याच्यासोबत आणखी काही जण तेथे गेलेले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत कपूरला ड्रग्स प्रकरणी जामीन मिळाली आहे. पण चौकशीसाठी जेव्हा त्याला बोलवण्यात येईल तेव्हा त्याला तिथे हजर राहावे लागेल. सध्या या प्रकरणाचा तपास चालू आहे.

 अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर आणि त्याच्यासह अन्य चार जणांना जामीन मिळाला आहे. पण जेव्हा चौकशीसाठी त्यांना बोलवण्यात येईल तेव्हा त्यांना हजर राहावे लागेल, अशी माहिती बंगळुरूचे डीसीपी भीमा शंकर गुलड यांनी एएनआयला दिली.

हॉटेलमध्ये होणाऱ्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड मारली तेव्हा 35 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी सिद्धांतची ड्रग्स टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.