‘बिग बॉस’ फेम अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी क...

‘बिग बॉस’ फेम अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने अखेर केला खुलासा (Actress Samruddhi Kelkar Open Up About Realtionship With Marathi Big Boss Contestant Akshay Kelkar)

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती. या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. समृद्धी अभिनयाच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर तिचे नाव जोडले जात आहे. यावरच तिने आता भाष्य केलं आहे.

समृद्धी केळकर अभिनयाच्याबरोबरीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. नुकतीच तिने राजश्री मराठीच्या टुडेस स्पेशल या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिला अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मी पहिले पहिले आमच्यावरचे व्हिडीओ पाहून कोमात गेले होते, माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आपल्या सिनेसृष्टीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारले, त्यावर मी आता उत्तर देते तो माझा खूप चांगला मित्र आहे. जवळपास ५ वर्ष आम्ही मित्र आहोत. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीच नाहीये.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. दोघांची नुकतीच ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम