अभिनेत्री प्रिया बापटला केळीच्या पानावरुन युजर्...

अभिनेत्री प्रिया बापटला केळीच्या पानावरुन युजर्सनी केले ट्रोल (Actress Priya Bapat Gets Trolled For Having Lunch On Banana Leaf)

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांचे खूप प्रेम मिळते. चाहते नेहमीच तिच्या प्रत्येक फोटोंना भरभरुन लाइक्स आणि कमेंट करत असतात. प्रियाने अलिकडेच एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. पण या फोटोमुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले.


प्रिया बापटने आपल्या चाहत्यांना ओनमच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो शेअर केला होता. पण तेव्हा तिला युजर्सनी ट्रोल केले. ओनमनिमित्त प्रिया केळीच्या पानावर जेवत होती. आणि ते पान वेगवेगळ्या पदार्थांनी भरले होते. हा फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला.

पण या फोटोवर चाहते मात्र नाराज झाले. कमेंटमध्ये एकाने विचारले की, केळीच्या पानावर जेवताना पान असं ठेवतात का? तर दुसऱ्याने म्हटलं केळीच्या पानावर अशाप्रकारे जेवताना पहिल्यांदाच पाहिलं. तर एका युजरने केळीचे पान हे जेवताना आडवे नाही तर उभे ठेवावे असा सल्ला दिला. तर दुसऱ्या युजरने प्रियाच्या पानात एवढे पदार्थ पाहून तुम्ही डाएटवर आहात हे विसरु नका असे म्हटले. तर तिसऱ्या युजरने जेवण कोणी केले असे विचारले.
प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती 2018 मध्ये आलेल्या आम्ही दोघी या चित्रपटानंतर दिसली नाही. आता लवकरच ती विस्फोट या हिंदी सिनेमात दिसणार आहे.