पूनम पांडे जखमी अवस्थेत हॉस्पिटलात दाखल : नवऱ्य...

पूनम पांडे जखमी अवस्थेत हॉस्पिटलात दाखल : नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप (Actress Poonam Pandey Hospitalised After Suffering Multiple Injuries, Her Husband Sam Bombay Arrested For Alleged Assault)

आपल्या बोल्डनेसाठी प्रसिद्ध असलेली पूनम पांडे जखमी अवस्थेत हॉस्पिटलात दाखल झाली आहे. नवरा सॅम बॉम्ब याने तिला मारहाण केली असल्याचा आरोप तिने केला आहे, ज्यामुळे पोलिसांनी सॅमला पकडून नेले आहे

एएनआयच्या वृत्तानुसार, पूनमला गंभीर दुखापत झाली आहे. पूनमचा चेहरा सुजला असून तिच्या डोळ्यावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे समजते.

सॅमने पूनमच्या केसांना पकडून तिला भिंतीवर आपटल्यामुळे तिला ही गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांच्यातील भांडणाचं कारण अजून समजलेलं नाही. परंतु या अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपल्या पतीवर मारहाणीचा आरोप केलेला नाही, तर यापूर्वीही हनीमुन दरम्यान पूनमने सॅमची तक्रार केली होती. हनीमुनसाठी गोव्याला गेलेल्या पूनमने तेव्हाही नवऱ्याने मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केला होता अन्‌ त्यावेळीही गोव्याच्या पोलिसांनी सॅमला अटक केली होती.

हनीमुन दरम्यान घडलेल्या मेलो ड्रामानंतर खरं तर पूनमने सॅमला सोडण्याचाच निर्णय घेतला होता. जनावरांसारखी मारहाण करणाऱ्या या माणसासोबत राहण्याचा मुर्खपणा कोण करेल? असंही तिनं म्हटलं होतं. तरीही तिनं तो मुर्खपणा केला. दोघंही भांडण मिटवून एकत्र आले होते. सॅमलाही गोवा पोलिसांनी जामीनावर सोडले होते.   

आता सॅमने तिला नुसतंच मारलं नाहीये तर त्याचा परिणाम काय होईल ते पाहण्याची धमकीही दिली असल्याचे, आपल्या तक्रारीमध्ये पूनमने म्हटले आहे.

सांगायचं म्हणजे, पूनमने १० सप्टेंबर २०२० ला सॅमसोबत गुपचुप लग्न केले होते आणि सोशल मीडियावर तिने आपल्या लग्नाची बातमी दिली होती. त्यानंतर काहीच दिवसात हनीमुनच्या दिवसापासूनच त्यांच्यात मारहाणीस सुरुवात झाली. लग्नाच्या आधी दोघं लिव्ह इन मध्ये राहत होते. मग लग्नानंतर कुठे माशी शिंकली काय माहीत?

पूनमचं आयुष्य अनेक वादांनी भरलेलं आहे. बरेचदा वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि बोल्डनेसमुळे ती फारच निंदिली गेली आहे. सध्या तिचं वैवाहिक आयुष्य देखील नीटसं रुळावर नाहीये.