मनाच्या उत्तम आरोग्यासाठी अभिनेत्री नीलम कोठारी...

मनाच्या उत्तम आरोग्यासाठी अभिनेत्री नीलम कोठारीचे हवापालट (Actress Neelam Kothari Spends Quality Time With Family)

‘हेल्थ इज् वेल्थ’ असं आपण प्रत्येकजण म्हणतो आणि म्हणूनच आपण स्वत:ची काळजी देखील घेतो. सध्याच्या साथीच्या आजारामुळे लोकं शारिरीक, मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जागरुक झाले आहेत आणि हे लक्षात घेता ८०- ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री, ज्वेलरी डिझायनर नीलम कोठारी सोनी सध्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे. ती पती, अभिनेता समीर सोनी आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी आहाना यांच्यासोबत घरापासून लांब जरा शांत आणि क्वालिटी टाईम एन्जॉय करत आहेत. नीलम कोठारी सोनी नेटफ्लिक्सवरील “Fabulous Lives of Bollywood Lives” मधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. एके काळी नीलमने अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबतही काम केले आहे.

नीलम आपल्या कुटुंबासह पुण्यातील मुळशी लेक येथील हेल्थ आणि वेलनेस रिसॉर्टला गेली असून, फॅमिली वेळ घालवण्यासाठी हे अगदी परफेक्ट ठिकाण आहे, असे नीलमने म्हटले आहे.

“या रिसॉर्टचा प्लॅन समीरने सुचवला आणि विशेष म्हणजे या रिसॉर्टमध्ये लहान मुलांसाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले; ज्यामध्ये कूकिंग, बागकाम, ट्रेंकिंगचे वर्ग आणि इतरही बऱ्याच उपक्रमांचा सहभाग होता. म्हणून आम्हांला वाटले की हे सर्व आमच्यासाठी आणि विशेष करुन आहानासाठी एक वेगळा अनुभव असेल”, असं नीलमने म्हटले.

साथीच्या आजारामुळे सर्वत्र तणावाचं, चिंताग्रस्त आणि भितीचं वातावरण निर्माण झालेलं त्यामुळे सतत तोच-तोच विचार करुन स्ट्रेस यायचा. तणावग्रस्त वातावरणातून दूर जाणे हे कधीकधी महत्त्वाचे असते. सिटी लाईफ खूप बदलली आहे. आपण सहजपणे बाहेर जाऊ शकत नाही, लोकांना भेटायला घाबरतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की, सध्याच्या भितीपासून जरा दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात, हिरवळीत, आनंदी वातावरणात जाणे हे आपल्या मनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरिराची काळजी नक्की घ्यावी पण त्या इतकंच मन ही जपा. मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्यास आवडेल असं बोलताना नीलम कोठारी सोनीने म्हटले की,  “It Will Be A Mind Detox, Digital Detox, Physical Detox…Everything!”