मौनी रॉय लवकर बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत विवा...

मौनी रॉय लवकर बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत विवाहबंधनात अडकणार! (Actress Mouni Roy to tie the knot with Dubai based banker Suraj Nambiar)

आपल्या मादक आणि बोल्ड अदांनी सतत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉय हिनं तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. तिच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. लवकरच मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्न करणार आहे.

Mouni Roy, Suraj Nambiar, wedding

या वर्षाच्या सुरुवातीलाच मौनीच्या आईनं तिची मैत्रीण मंदिरा बेदी हिच्या घरी सूरजच्या आईवडिलांची भेट घेतली होती. मौनीच्या भावाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये तिचा आणि सूरजचा विवाहसोहळा पार पडेल. त्यांचा विवाहसोहळा इटली किंवा दुबई या दोनपैकी एका ठिकाणी होणार असल्याचं सांगितलं जातंय.

Mouni Roy, Suraj Nambiar, wedding

मौनी पश्चिम बंगालमधील कूच बेहर या ठिकाणची मूळ रहिवासी असून या ठिकाणीसुद्धा दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. सूरज दुबईमध्ये बिझनेसमन आहे. मौनी आणि सुरज दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. मौनीच्या घरामध्ये लग्नाची तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान, मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मौनी लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम