जेलमधून बाहेर आलेल्या केतकी चितळेचे खळबळजनक खुल...

जेलमधून बाहेर आलेल्या केतकी चितळेचे खळबळजनक खुलासे (Actress Ketaki Chitale Makes Stunning Statements After Coming Out Of Jail )

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. केतकीची ४० दिवसांनी जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने ठाण्याच्या जेलमध्ये असताना तिच्यासोबत कशाप्रकारे व्यवहार करण्यात आला याबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत केतकीने सांगितले, मी जेलमध्ये असताना माझ्यासोबत छेडछाड केली गेली. मी साडी घातली होती. तेव्हा जबरदस्ती माझी साडी खेचण्याचा प्रयत्न केला. मी खाली पडली तेव्हा माझ्यावर अंडी , शाई , रंग फेकला गेला. माझ्या स्तनांना हात लावण्यांचा प्रयत्न केला गेला.

केतकी पुढे म्हणाली, मला वॉरंट नसताना अटक करण्यात आली होती. मी काहीच चुकीचे केले नव्हते तरी माझ्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करण्यात आला. मी केवळ एक कविता पोस्ट केली म्हणून मला कोणतीही सूचना न देता अटक केली. मी कोणावरही निशाणा साधला नव्हता पण लोकांनीच ती कविता शरद पवारांशी जोडली. आणि माझ्यावर २२ एफआयआर नोंदवले गेले.