स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्री कनिष्काने सांग...

स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्री कनिष्काने सांगितले आपल्या लग्नामागचे कारण,म्हणाली पुरुषांची भीती वाटते (Actress Kanishka Soni Reveals: Once I Met A Legendary Actor And Said My Mother Is A Huge Fan Of Him, He Replied- ‘Teri Maa Ke Saath Main Kya Karunga?’)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कनिष्का सोनी स्वत:शीच लग्न केल्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र तिने या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नाही. आता तिने तिच्या अशा लग्नामागचे कारण सांगितले आहे.

हिंदूस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कनिष्काने तिच्या लग्नाचे कारण स्पष्ट केले.कनिष्का म्हणाली की, पुरुषांवरील विश्वास अशाप्रकारे उडाला आहे की, त्यांच्यासोबत आता कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध ठेवायलाच भीती वाटते. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ती अशा परिवारात मोठी झाली जिथे मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा. ज्यांच्या मते, चांगल्या मुली कधीच दारु पित नाही, शिव्या देत नाही, लग्नानंतर त्या आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक नाती निभावतात.

कनिष्काने सांगितले की, ती 2010 आणि 2011 मध्ये एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र तो अभिनेता आता तुरुंगात आहे. तो खूप हिंसक आणि रागीट होता. तो मारहाण करायचा. मी नाव सांगणार नाही अन्यथा वाद निर्माण होऊन त्याला फुकटची प्रसिद्धी मिळेल. त्याने माझे लैंगिक शोषण केले नाही परंतु त्याने माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. त्याने माझा पासपोर्टही आपल्याजवळ ठेवला होता आणि मी त्याच्याशी संबंध तोडले तर तो माझे आणि माझ्या कुटुंबाचे नुकसान करेल, अशी धमकी द्यायचा. पण एके दिवशी तो बाथरूममध्ये असताना कसा तरी मी माझा पासपोर्ट घेऊन त्याच्या घरातून पळ काढला. या प्रकरणातून सावरायला मला पाच वर्षे लागली.

त्यानंतर आयुष्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझी फसवणूक केली आणि भावनिक ब्लॅकमेल केले त्यामुळे ते नातेही तुटले. त्यानंतर त्याच्या मैत्रिणीने मला फोनवर, मी मानसिकदृष्ट्या तुटल्यामुळे तो माझ्यावर हसत होता ते सांगितले. यानंतर माझा पुरुषांवरील विश्वास कमी झाला आणि मी एकटीच राहण्याचे ठरवले.

अभिनेत्री म्हणाली की, मी हे कुंकू आणि मंगळसूत्र घालून मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही हे सांगितले. ज्यासाठी मला लोकांनी खूप सुनावले होते. 

दरम्यान कनिष्काने इंडस्ट्रीशी संबंधित विचित्र घटनांचा उल्लेख केला. तिने सांगितले की मी एकदा एका दिग्गज अभिनेत्याला भेटले होते. मी त्याला म्हणाले माझी आई तुझी खूप मोठी चाहती आहे. त्यावर त्याने प्रत्युत्तर दिले की, मी तुझ्या आईचे काय करू? एवढ्या मोठ्या अभिनेत्याच्या तोंडून हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला.

इतकंच नाही तर कनिष्काने कास्टिंग काउचबद्दलही सांगितले की, दिवसभर शूटिंग करूनही ती त्याच्या खोलीत गेली नाही म्हणून एका निर्मात्याने तिला टीव्ही शोमधून काढून टाकलं होतं. याशिवाय ए ग्रेडच्या एका चित्रपट निर्मात्याने त्यांना पोट बघायचे असल्याचे कारण देत आपल्या घरी येण्यास सांगितले होते.

कनिष्कने ‘दिया और बाती हम’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’, ‘पवित्र रिश्ता’, ‘देवों के देव महादेव’ आणि ‘महाबली हनुमान’ सारख्या यशस्वी मालिकांमध्ये काम केले होते, परंतु तिला तिच्या आयुष्यात असे काही कटू अनुभव आले. ज्यामुऴे तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती सध्या इंडस्ट्रीपासून दूर न्यूयॉर्कमध्ये आहे. टीव्ही जगताचा निरोप घेताना कनिष्का म्हणाली – मी न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये शिकणार आहे कारण बहुतेक बॉलिवूड स्टार्सची मुले इथे येतात .इथे शिकण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते आणि मला आनंद आहे की मी इथे शिकायला आले आहे.