काजोलला करोनाची लागण (Actress kajol corona test...

काजोलला करोनाची लागण (Actress kajol corona tests positive)

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले, तसेच ते लवकर यातून बरेही झाले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलला करोनाची लागण झाली आहे. काजोलने आज (30 जानेवारी) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. काजोलने इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी तिची मुलगी न्यासा देवगणचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री काजोल ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने मुलगी न्यासाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना काजोल म्हणाली की, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला माझे लाल नाक कोणालाही दाखवायचे नाही. त्यामुळे मला जगातील सर्वात गोड हसणे शेअर करणे योग्य वाटले. मिस यू न्यासा देवगण”. काजोलच्या या पोस्टवर प्रियांका चोप्रासह अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

काजोलच्या या पोस्टवर कमेंट करताना प्रियांका म्हणाली की, ‘ती विलक्षण आहे’. तर काजोलची बहिण तनिषा मुखर्जी हिने ‘तुला काही आभासी पद्धतीने मिठी (Hugs) पाठवत आहे’, असे म्हटले आहे.

काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. न्यासा ही सध्या तिच्या अभ्यासानिमित्त सिंगापूरमध्ये आहे. तर युग हा सध्या मुंबईत त्याच्या आई-वडिलांसोबत शिक्षण घेत आहे. तर अजय देवगण हा सध्या त्याच्या ओटीटी डेब्यूमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याच्या ‘रुद्र’ या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यात त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक केले जात आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम