हिमानी शिवपुरीची कॅन्सरशी झुंज… (Actress ...

हिमानी शिवपुरीची कॅन्सरशी झुंज… (Actress Himani Shivpuri Opens About Her Journey With Big C On This World Cancer Day)

आज जागतिक कॅन्सर दिन आहे. हा प्राणघातक रोग सहसा कुणाला क्षमा करत नाही. परंतु त्याच्याशी लढून जगणारे काही शूरवीर लोक आहेत. अभिनेत्री हिमानी शिवपुरी ही त्यापैकी एक आहे. ‘हप्पू की उलटन पलटन’ या कार्यक्रमाची ही अभिनेत्री आपण कर्करोगाशी कशी झुंज दिली, याबद्दल सांगते आहे.

आपल्याला कॅन्सर झाला, हे हिमानीला जेव्हा कळलं…
‘हप्पू की उलटन पलटन’ या ॲन्ड टी.व्ही. च्या शो मध्ये कटोरी अम्माची भूमिका करणाऱ्या हिमानी शिवपुरीच्या जेव्हा लक्षात आलं की, आपल्याला कॅन्सर झाला आहे, तेव्हा तिचा विश्वास बसेना. ती म्हणते, कॅन्सरची लक्षणे दिसताच, मी खूपच घाबरले. अस्वस्थ झाले. सगळं काही ठीक असू दे, अशी प्रार्थना करत मी डॉक्टरांकडे गेले. टेस्ट केल्यावर माझ्या सेल्समध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले. तेव्हा ही गाठ कॅन्सरची आहे किंवा नाही, याची बायप्सी करण्यात आली. त्यच्या रिपोर्टवरून मला कॅन्सर झाल्याची खात्री झाली. ही खतरनाक बिमारी झाली असल्याचे मी मानायला तयार नव्हते. पण मी स्वतःला सावरलं आणि मेडिकल टीमला सहकार्य केलं.

हिमानीने कर्करोगावर कशी मात केली?
ज्या कुणाला ही खतरनाक बिमारी होते, ती व्यक्ती हिमानी प्रमाणेच सहसा हे सत्य स्वीकारायला तयार होत नाही. त्यानुसार ती पुढे म्हणाली, ”कॅन्सरवर मात करण्यासाठी डॉक्टरांनी केमोथेरपीचे ६ सेशन्स करण्याचा सल्ला दिला. त्याला मी लगेच होकार दिला. पण रिकव्हरीचा हा इलाज किती खडतर होणार आहे, याची मला कल्पना नव्हती. केमोथेरपीचे पहिले सेशन झाल्यावर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दिल्लीकडे निघाले. पण त्या इंजेक्शनच्या तगड्या डोसमुळे मला विमानात अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मला विमानातून उतरवा, म्हणजे डॉक्टरांनी दिलेले औषध घेऊन बरे वाटेल, असे मी अटेंडटला सांगितले.”
या रोगातून मुक्त होण्याचा प्रवास हा तिच्या जीवनातील कठीण काळ होता. पण तिनं हार न मानता कॅन्सरचा पराजय केला. हिमानी पुढे सांगते, ”दिल्लीहून परतल्यावर मी केमोथेरपीचे सर्व सेशन्स पूर्ण केले. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी दरवर्षी चेकअप करून घेते. मी कॅन्सरवर मात केलेली विजेती आहे, असं मी अभिमानाने लोकांना सांगते. शिवाय माझं लोकांना हे सांगणं आहे की, हा रोग झाल्यास योग्य ती काळजी घ्या.”
हिमानीने हम आप के है कौन, दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे, कुछ कुछ होता है, परदेस, हिरो नं. १, बिवी नं. १, एक और एक ग्यारह अशा सुपरहिट चित्रपटांमधून आपली अभिनय कारकीर्द गाजविली आहे. तसेच हमराही या टी.व्ही. मालिकेतील देवकी भौजाईची त्यांची व्यक्तीरेखा अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.