खासदार – अभिनेत्री हेमा मालिनीने घेतला को...

खासदार – अभिनेत्री हेमा मालिनीने घेतला कोरोना वैक्सिनचा पहिला डोस (Actress Hema Malini Takes COVID-19 Vaccine In Mumbai)

बॉलिवुडमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतलेला आहे. हेमा मालिनी ७२ वर्षांच्या आहेत. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. म्हणूनच हेमा मालिनी यांनी लशीचा पहिला डोस घेऊन स्वतःला सुरक्षित केलं आहे. सर्व जनतेने सुरक्षेसाठी हे लसीकरण करून घ्यावे याबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी हेमा मालिनी यांनी आपले फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत.

Photo Courtesy: Twitter (All Photos)

हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटरवर असं लिहिलंय की, मी कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्यांसोबत लस टोचून घेतली आहे. हेमा मालिनी यांनी जे फोटो शेअर केले आहेत त्यात त्या एका पोस्टरच्या बाजूला उभ्या आहेत आणि त्या पोस्टरवर असं लिहिलंय – मी कोविड -१९ ची लस घेतली आहे, तुम्ही घेतली का? या आधी सैफ अली खानने देखील कोविड -१९ ची लस घेऊन स्वतःला सुरक्षित करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. लोकांनी लसीकरणास न घाबरता स्वतःच्या सुरक्षेसाठी लस घेणे गरजेचे आहे, असा संदेश या कलाकारांकडून दिला जात आहे.