वादळाने पडलेल्या झाडांमध्ये अभिनेत्री दीपिका सि...

वादळाने पडलेल्या झाडांमध्ये अभिनेत्री दीपिका सिंहचा बेफाम डान्स (Actress Deepika Singh Seen Dancing Amid Cyclone ‘Tauktae ‘, See Viral Photos and Videos)

सिने आणि टी. व्ही. मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सक्रीय राहण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय काय चक्रमपणा करतील, ते सांगता यायचं नाही. याचे उत्तम उदाहरण टी. व्ही. स्टार दीपिका सिंहने दाखवलं आहे. तौक्ते या भयंकर चक्रीवादळाने महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातच्या किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं. मुंबईला स्पर्शून गेलेल्या या वादळाने तुफानी वाऱ्यासह २४ तास मुसळधार पावसाने झोडपले. त्याच्या भयंकर तांडवाने जिकडे तिकडे लहानमोठी झाडे पडली. रस्त्यांवर फांद्यांचा, पानांचा खच पडला. त्यामध्ये या दीपिकाने झोकात डान्स केला. पावसामध्ये भिजत तिने या पडलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये जबरदस्त नृत्य केले व त्याचे फोटो, व्हिडिओज्‌ पोस्ट केले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘दिया और बाती’ या मालिकेने दीपिका सिंहला लोकप्रियता मिळवून दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर या पोस्ट शेअर करून लिहिले की, ”तुम्ही तुफानाला शांत करू शकत नाही. त्यामुळे प्रयत्नही करू नका. मात्र स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. निसर्गावर प्रेम करा, कारण हे वादळ निघून जाणार आहे.”

दीपिकाने पुढे असंही लिहिलं आहे -”हे झाड माझ्या घराबाहेर पडलं. त्याने कुणालाही इजा झाली नाही. मी आमच्या दरवाजातून त्याला हटवू शकले नाही. पण मी आणि रोहितने त्याचे फोटो घेतले, जेणेकरून या तौक्ते तुफानाच्या स्मृती राहतील.”

वादळाने आलेल्या पावसात भिजत डान्स करतानाचे दीपिकाचे फोटो व व्हिडिओज्‌ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कॅप्शन टाकून ती म्हणते- ” वादळ जाण्याची वाट पाहणे, ही आपली जिंदगी नाही. तर या पाऊसवाऱ्यात डान्स करायला शिका.”

फोटो व व्हिडिओमधून दीपिका आनंद व्यक्त करताना दिसत असली तरी ते पाहून युजर्सनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एक युजर म्हणतोय्‌,” अगं, या तुफानामध्ये तू उडून जाशील.” तर दुसरा म्हणतो, ” इकडे लोक मरताहेत, अन्‌ तुम्ही मस्ती करताय्‌.” इतर काही युजर्सनी दीपिकाला ट्रोल करत म्हटले की, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही प्रमोट करायला नको होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दीपिका सिंहला ‘दिया और बाती’ या मालिकेने बरीच लोकप्रियता मिळवून दिली. त्यामध्ये तिने संध्या बिंदणी हे पात्र साकारले. जे प्रेक्षकांना खूप आवडले. तिचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत. कारण ती अधूनमधून तिथे आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. मात्र वादळातील तिचा हा डान्स काहींना आवडला तर काहींनी तिच्या या कृतीला मोठ्या संख्येने ट्रोल केले आहे.