अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी जावेदच्या फोटोंना ...

अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी जावेदच्या फोटोंना ‘वाह्यातपणा’ असे म्हटले, त्यावर भडकलेल्या उर्फीने दिले खरमरीत उत्तर ( Actress Chahat Khanna Trolls Uorfi Javed With Bad Words:Uorfi Javed Fumes With Anger)

उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ती रोज वेगवेगळे अतरंगी कपडे घालून फोटोशूट करत असते. रणवीर सिंह, मसाबा यांसारख्या सेलिब्रेटींनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. कोणी कौतुक करो वा ट्रोल उर्फी त्यावर लगेच आपली प्रतिक्रिया देते. आता अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फीच्या लूकला ट्रोल केले आहे. यावर उर्फी भडकली असून तिने देखील खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे.

चाहत खन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उर्फीचे लेटेस्ट फोटो शेअर करत काय वाह्यातपणा आहे असे म्हटले आहे. यावर उर्फीने सुद्धा चाहत खन्नाला खडेबोल सुनावले आहे.

चाहत खन्नाने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्फीचा फोटो पोस्ट करत लिहिले की, असे कपडे कोण घालतं ? म्हणजेच कोणीही आपले कपडे काढले की मीडिया त्यांना सेलिब्रेटी बनवते. भारतीय मीडियाला काय झाले आहे ? अशी स्वस्त प्रसिद्धी मिळवणे खूप सोपे आहे. हाच फालतूपणा तुम्ही येणाऱ्या नव्या पिढीला देत आहात. कोणीही प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसे देईल, काहीही करेल किंवा कॅमेऱ्यासमोर न्यूड होतील तुम्ही त्यांच्या पाठी लागाल का ? हे खूपच चुकीचे आहे. देवाने तुला सुबुद्धी द्यावी. सोबतच तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

उर्फी जावेदने जेव्हा चाहतची स्टोरी पाहिली तेव्हा तिला प्रतिउत्तर म्हणून आपल्या स्टोरीवर लिहिले की, मी तुझ्यासारखे फॉलोवर्स खरेदी करत नाही. आणि तुला माहित नसेल तर सांगते तिथे मी एका मुलाखतीसाठी गेली होती. ज्याच्याशी तुझे काहीच देणे घेणे नाही. तू माझ्यावर जळतेस कारण पापाराझींना तू पैसे देऊन सुद्धा ते तुला कव्हर करत नाहीत. कोणी काही करो त्याच्याशी तुला फरक पडला नाही पाहिजे. तू अशी स्टोरी रणवीर सिंहसाठी का नाही ठेवत. यावरून तुमची दुहेरी वृत्ती स्पष्टपणे दिसून येते .मी तुझ्या दोन घटस्फोटांबद्दल किंवा तुझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला डेट  केल्याबद्दल कधी काही बोलली नाही मग तू का करतेस.

उर्फी एवढ्यावरच थांबली नाही. तिने इन्स्टाग्रामवर चाहतचा एक टॉपलेस फोटो शेअर केला आणि लिहिले की, संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी असे फोटोशूट करू शकते. तुझ्या मते तर सोशल मीडियावर खरे लोक नसतात ना. तू फक्त मला मिळणाऱ्या प्रेमामुळे माझ्यावर जळतेस. मला तुझ्या मुलीसाठी खूप वाईट वाटते. कशी आई आहे तिच्याकडे.

सोबतच उर्फीने चाहतच्या आणखी एका पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हटले की, ३.३ मिलियन फॉलोवर्स आणि फक्त ९ हजार लाइक्स कसे ?. मी माझ्या स्वत:पुरते कमावते तरी, तुझ्यासारखी दोन दोन एक्स  नवऱ्यांकडून मिळणाऱ्या पोटगीवर जगत नाही.