केबीसीच्या मंचावर ‘तारक मेहता का उल्टा चष...

केबीसीच्या मंचावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार लावणार हजेरी ( Actors of ‘Taraq Mehta Ka Ulta Chashma’ will appear on the stage of KBC)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नसून त्यांच्या ज्ञानातही भर पडते. केबीसी १३ चा आगामी भाग एकदम स्पेशल आहे. या भागामध्ये प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेची म्हणजेच ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ची टीम दिसणार आहे. मालिकेतील एक दोन कलाकार नव्हे तर सर्वच २२ कलाकार या स्पशेल एपिसोडमध्ये उपस्थित असणार आहेत. नुकतंच केबीसीने याबाबतचा एक प्रोमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.

taraq Mehta Ka Ulta Chashma, KBC, तारक मेहता का उल्टा चष्मा

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नुकतंच या मालिकेच्या संपूर्ण टीमने केबीसीच्या १३ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी हॉटसीटवर जेठालाल म्हणजे दिलीप जोशी आणि अमित भट्ट म्हणजे बापूजी हे दोघे बसलेले दिसत आहे. याचा एक प्रोमोशनल व्हिडीओ केबीसीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. केबीसीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

taraq Mehta Ka Ulta Chashma, KBC, तारक मेहता का उल्टा चष्मा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ने काही दिवसांपूर्वी एक हजार एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. २००० सालामध्ये सुरु झालेल्या या शोचा सध्या १३वा सिझन सुरु आहे.