स्वप्निल जोशीचा चला हवा येऊ द्या शोला रामराम (A...

स्वप्निल जोशीचा चला हवा येऊ द्या शोला रामराम (Actor Swapnil Joshi Takes A Sudden Exit From ‘Chala Hawa Yeu Dya)

मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट हिरो अशी ओळख असणाऱ्या स्वनिल जोशीचा वाळवी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे अभिनेता सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. विविध ठिकाणी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे.

याशिवाय स्वप्निल झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत नायकाची भूमिका साकारत आहे. तसचे चला हवा येऊ द्या या शोमध्ये तो परीक्षकाची भूमिका पार पाडत असल्याचे पाहायला मिळते. टेलिव्हिजन सांभाळून स्वप्निल वेगवेगळ्या चित्रपटांच्या प्रोजेक्टवरही काम करत आहे.

मालिकांचे शूटिंग, चित्रपटाचे शूटिंग, प्रमोशन, जाहिराती आणि एन्डॉर्समेंट अशा प्रकारच्या कामांची धुरा स्वप्निल आपल्या खांद्यावर पेलत आहे.

सोमवारी प्रदर्शित झालेल्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये स्वप्निल तो शो सोडत असल्याचे समोर आले. त्याने हा निर्णय का घेतला यामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र प्रचंड काम आणि नव्या प्रोजेक्ट्समुळे स्वप्नीलने हा कार्यक्रम सोडला असल्याचं म्हटलं जातंय.

स्वप्निलच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र त्याच्या या निर्णयाने आता प्रेक्षक थोडेसे नाराज झाले आहेत. मात्र तो नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.