तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नवा तारक उर्फ सच...
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नवा तारक उर्फ सचिन श्रॉफ पु्न्हा एकदा पडला प्रेमात, या दिवशी करणार लग्न (Actor Sacchin Shrof Finds Love Again, To Get Married On THIS Date)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारा सचिन श्रॉफ पुन्हा एकदा दुसऱ्या लग्नासाठी सज्ज झाला आहे. या महिन्याच्या २५ तारखेला तो लग्न करणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने अजूनतरी त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणालाच काही माहिती दिलेली नाही.
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये तारकची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाने मालिका सोडल्यानंतर त्यांच्याजागी सचिन श्रॉफची वर्णी लागली. तेव्हापासून सचिन प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. शोमध्ये नवीन एंट्री केल्यानंतर आता सचिनच्या वैयक्तिक आयुष्यातही कोणीतरी खास एंट्री करत आहे. नुकताच सचिन श्रॉफने सोशल मीडियावर आपला आनंद शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ या महिन्याच्या २५ तारखेला लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याने असेही सांगितले की त्याची भावी वधू त्याची कौटुंबिक मैत्रिण आहे. अभिनेत्याने आपल्या भावी वधूबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की अभिनेत्याचे हे लग्न म्हणजे अरेंज्ड मॅरेज असून मुलगी ग्लॅमर इंडस्ट्रीतील नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. सचिनचे कुटुंब अंधश्रद्धाळू असल्यामुळे लग्नाचे सर्व विधी साधेपणाने आणि शांततेत पार पडावेत अशी त्यांची इच्छा आहे.
अभिनेत्याची पत्नी इव्हेंट मॅनेजर आणि इंटिरियर डिझायनर आहे. नववधू आणि सचिनची बहीण चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यामुळे ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून सचिनने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सचिन श्रॉफचे हे दुसरे लग्न आहे, पहिले लग्न अभिनेत्याने टीव्ही अभिनेत्री जुही परमारसोबत केले होते. पण लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. सचिन आणि जुहीला समायरा नावाची मुलगी देखील आहे. सध्या समायरा तिच्या आईसोबत राहते.