अक्षयकुमार नंतर गोविंदाला करोनाची लागण (Actor G...

अक्षयकुमार नंतर गोविंदाला करोनाची लागण (Actor Govinda Tests Covid – 19 Positive )

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्या पाठोपाठ गोविंदाचा नंबर लागला आहे. गोविंदाला करोनाची लागण झाली असून तो सध्या घरातच क्वारंटाईन झाला आहे. घरातच त्याने औषधोपचार सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पत्नाली करोना झाला होता. त्यावर तिने मात केली आहे.

आपल्याला करोना झाल्याची माहिती स्वतः गोविंदानेच जाहीर केली आहे. अन्‌ गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशी त्याने विनंती केली आहे.