अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्ल...
अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकारानं निधन (Actor & Big Boss Winner Siddharth Shukla Passes Away)

By Anita Bagwe in मनोरंजन
लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज गुरुवारी निधन झालं. कूपर इस्पितळातून त्याच्या निधनाच्या बातमीची पुष्टी देण्यात आली आहे. ४० वर्षीय सिद्धार्थचे हृदयविकाराने निधन झाले.

सिद्धार्थ अतिशय लोकप्रिय होता. त्याने बालिका वधूच्या पहिल्या पर्वामध्ये काम केले होते, तेव्हापासूनच तो चाहत्यांचा आवडता झाला होता. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.