कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना मारण्याची धमकी द...

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना मारण्याची धमकी देणारा अटकेत (Accused In Katrina Kaif An Vicky Kaushal Death Threats Case Nabbed By Mumbai Police )

गेले काही दिवस सतत अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या.

एका अज्ञात व्यक्तीकडून या धमक्या येत असल्याचे म्हटले जाते. कतरिना आणि विकीला धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध विकीने आज सकाळीच सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी तपास सुरू केला.

आता पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. कतरिना आणि विक्की कौशल यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव मनविंदर सिंग असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

मनविंदर हा कतरिना कैफचा मोठा चाहता आहे आणि त्याला कतरिनाशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र कतरिनाने विकी कौशलसोबत लग्न केले. हाच राग मनात ठेवून गेल्या काही महिन्यांपासून मनविंदर कतरिनाला सोशल मीडियावर सतत त्रास देत होता.