About Majhi Saheli

माझी सहेली ओळख नव्या मैत्रीची

माझी सहेली महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं आणि महिलांसाठीचं पहिल्या क्रमांकावर असलेलं मासिक आहे. यात महिलांशी संबंधित सर्व पैलू आणि बाबींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांशी निगडीत गोष्टी, त्यांचे आदर्श, त्यांची स्वप्नं आणि काळानुसार बदलत गेलेली तिच्या जीवनातील स्थित्यंतरं या सगळ्यांचा परामर्श माझी सहेली घेत आली आहे. समाजातील प्रत्येक स्त्रिची कधी मैत्रिण बनून तर कधी मार्गदर्शक बनून तिने साथ दिली आहे. देशातील प्रत्येक स्त्रिनं आयुष्यात स्वतःची प्रगती केली पाहिजे. तिनं सगळ्यांसारखं एक आनंदी व स्वच्छंदी आयुष्य जगलं पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्याचा माझी सहेलीचा निश्चय आहे.

माझी सहेली मासिकातील महिलांच्या आवडीचं सौंदर्य, फॅशन सदर असो, शिक्षण, करिअर या क्षेत्रात काहीतरी नवीन करायचं असो, नातेसंबंधातील काही गोष्टी असोत, गुंतवणूकीबाबत काही शंका आहेत, कायद्याबद्दलची माहिती हवी आहेअशा अनेक विषयांची उत्तमोत्तम माहिती मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा माझी सहेलीच्या मासिकाचा प्रयत्न आहे. महिलांनी आपल्या परंपरा जपत असतानाच आपल्यातील क्षमतेचा ठाव घेऊन स्वतःचं जीवन सार्थकी लावावं. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावं, थोडंसं साहसी बनावं, आत्मनिर्भर बनावं, जीवनात यशस्वी ठरावं यासाठी माझी सहेली प्रत्येकीच्या सोबत आहे. पदोपदी तिला मार्गदर्शन करत आहे. तिच्यामधील आत्मविश्वास जागृत करत आहे. तिच्यासाठी नवनवीन मार्ग धुंडाळत आहे.