अभिषेक बच्चनने आराध्याच्या १०व्या वाढदिवसाचे फो...

अभिषेक बच्चनने आराध्याच्या १०व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले (Abhishek Bachchan Shares A Glimpse Of Daughter Aaradhya Bachchan’s 10th birthday Celebration In Maldives)

बॉलिवूड सेलिब्रेटी कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी मालदीव येथील बेटावर आपली मुलगी आराध्या बच्चनचा १० वा वाढदिवस नुकताच साजरा केला. त्यांनी आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या-अभिषेक अन्‌ आराध्या मालदीव येथील सौंदर्याच्या सान्निध्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत.

अभिषेक बच्चनने आपली मुलगी आराध्याला सोशल मीडियावर १०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर आराध्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय,  “हॅपी बर्थडे प्रिन्सेस! तुझी आई म्हणते त्याप्रमाणे, तू जग सुंदर बनवतेस. आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि देव तुला नेहमी सुखी ठेवो.”

ऐश्वर्या रायने देखील मुलगी आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आराध्याच्या सुंदर फोटोला ऐश्वर्या रायने कॅप्शन दिली आहे, “प्रिय आराध्या, तू माझ्या श्वासाचे कारण आहेस. तूच माझे जीवन आहेस… तू माझा आत्मा आहेस… मी तुझ्यावर निःस्वार्थी प्रेम करते…” अन्‌ हृदयाचे इमोजी टाकले आहेत.

मालदीव बेटावरील रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी ज्या वाहनाचा वापर केला होता त्याचाही फोटो अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मिडियावरील आराध्याच्या वाढदिवसाची पोस्ट पाहून बंगाली बाला बिपाशा बासू, अनुपम खेर, नव्या नंदा आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आराध्या बच्चनला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बच्चनचा मित्र सिकंदर खेर याने त्याच्या इंस्टाग्रामवर १० वर्षांच्या मुलीचा न पाहिलेला फोटो शेअर केला आहे आणि आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिकंदर खेरने, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे….तू नेहमी निरोगी राहा आणि देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असू दे !!! सिकू चाचू, असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याने रिसोर्टमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये बच्चन परिवारातील हे छोटं कुटुंब समुद्रकिनारी आपला वेळ मजेत घालवताना दिसत होते.