अमिताभ बच्चन इतका दिवाळखोर झाला होता की, स्टाफक...

अमिताभ बच्चन इतका दिवाळखोर झाला होता की, स्टाफकडून जेवणासाठी त्याने उधारी केली… अभिषेक बच्चनचा गौप्यस्फोट (Abhishek Bachchan Narrated A Painful Anecdote Related To Amitabh Bachchan’s Poverty, Had To Borrow From The Staff For Food)

‘कौन बनेगा करोडपती’ हा अतीव लोकप्रिय कार्यक्रम सादर करणारा, बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन प्रत्यक्ष जीवनात मोठा करोडपती आहे. लाखो रुपयांचे पेन, लॅपटॉप, महागड्या मोटारगाड्या आणि खासगी विमान तो बाळगतो. पण हाच महानायक कोणे एके काळी रोडपती झाला होता, दिवाळखोर झाला होता, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे कडू सत्य आहे, ज्याचा गौप्यस्फोट अभिषेक बच्चननेच केला आहे.

Abhishek Bachchan, Poverty

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुपरस्टार, मेगास्टार, महानायक अशी भूषणे ज्याला लाभलीहोती आणि अभिनयाचे उत्तुंग शिखर ज्या अमिताभने गाठले होते, त्याच्या जीवनात एक कालखंड असा आला की, त्याच्याकडे एकही चित्रपट नव्हता. कोणीही त्याला सिनेमात घेत नव्हते. तो कर्जबाजारी झाला होता.

Abhishek Bachchan, Poverty

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पण म्हणतात ना, वाईट काळ जास्त दिवस टिकत नाही. त्यानुसार त्याला ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची ऑफर आली. अन्‌ हे दिवस फिरले. मात्र त्या वाईट काळाच्या आठवणी आजही अभिषेक बच्चनच्या मनात घर करून आहेत.

आपलं सर्व कुटुंब त्या काळात आर्थिक संकटात भरडलं गेलं होतं, असं अभिषेक बच्चनने ‘द रणवीर पॉडकास्ट’ या कार्यक्रमात सांगितलं.

या कार्यक्रमात बोलताना अभिषेकने सांगितले, “या इसमाने चांगल्या पगाराची नोकरी सोडली व मुंबईत आला. मरीन ड्राइव्हच्या बेंचवर झोपून रात्र काढली. ऑल इंडिया रेडिओत प्रयत्न केला, पण आवाज नापसंत करण्यात आला. तो खूपदा हरला.”

Abhishek Bachchan, Poverty

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आज ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं तरी अमिताभ बच्चन दिवसाचे १६-१७ तास काम करतो. त्याच्या घरात इतकी गरीबी आली होती की, त्या दिवसांच्या आठवणी अभिषेक सांगतो, “आज रात्री आमच्या जेवणाची सोय, पिताजी कशी करतील, याची आम्हाला भ्रांत असायची. इतके वाईट प्रसंग आमच्यावर गुदरले होते. आपल्या स्टाफकडून पैसे उधार घेऊन जेवणाची व्यवस्था करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.”

Abhishek Bachchan, Poverty

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपला मुलगा अभिषेक बच्चनने सांगितलेल्या गोष्टी ऐकून अमिताभ खूपच भावुक झाला होता. नव्वदीच्या दशकातही ही कर्मकहाणी आहे. ज्यावेळी अमिताभकडे काहीच काम नव्हतं. आणि एबीसीएल ही त्याची कंपनी फारच नुकसानीत गेली होती. त्यावेळी पडेल ती भूमिका करायला अमिताभ तयार होता. त्याच्या पडत्या काळात केबीसी कार्यक्रम आणि ‘मोहब्बते’ या चित्रपटाने त्याला तारले.