आराध्याची टिंगल करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिषेक बच्च...

आराध्याची टिंगल करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिषेक बच्चनच्या अंगाचा भडका उडाला (Abhishek Bachchan Got Furious at Trollers : Actor Slammed Those Who Trolls His Daughter Aaradhya)

संपूर्ण बच्चन परिवारातील लाडकी अन्‌ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) मुलगी आराध्या (Aaradhya), ही सेलिब्रिटी किड असल्याने तिला बरेचदा काहीना काही कारणाने ट्रोल केले जाते. अगदी अलीकडे तिच्या चालण्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. यावेळी मात्र अभिषेकची सहनशक्ती संपली आणि आपल्या मुलीची टिंगल करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिषेकच्या अंगाचा भडका उडाला. अभिषेकने या टिंगलखोरांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

एका एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले. तो म्हणाला की, “मी एक पब्लिक फिगर आहे, तुम्ही मला ट्रोल करत असाल तर मी समजू शकतो, पण आराध्या या सगळ्यापासून दूर आहे. तिला काहीही बोललेले मी कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि ही सहन करण्यासारखी गोष्टच नाही. कुणाला काही बोलायचे असेल तर त्याने समोर येऊन तोंडावर बोलून दाखवावे.” आराध्याला ट्रोल करण्याव्यतिरिक्त, लोकांनी ऐश्वर्या रायची देखील अनेकवेळा ओव्हर प्रोटेक्टिव्ह म्हणून खिल्ली उडवली आहे, हे सुद्धा अभिषेकला खटकलेले आहे.

आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya
आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

काही दिवसांपूर्वी एअरपोर्टच्या बाहेर पडत असताना ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये आई आणि मुलगी दोघीही काळ्या कपड्यात दिसल्या होत्या. व्हिडिओमध्ये आराध्या तिची आई ऐश्वर्याचा हात धरून मुरडत मुरडत चालत होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी ऐश्वर्या आणि तिच्या मुलीला प्रचंड ट्रोल केले. ऐश्वर्यावर निशाणा साधत एका व्यक्तीने लिहिले – अरे, कधीतरी तिचा हात सोडा, असं पकडलं आहे जशी काय ती कुठे हरवणार आहे. त्याचवेळी एका व्यक्तीने आराध्याला ट्रोल करत, तिच्या पायात काही समस्या आहे किंवा ती मुद्दाम अशी चालत आहे असे विचारले होते.

आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya
आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

ट्रोल करणारे इथेच थांबले नाहीत, तर बच्चन घरात जन्माला आल्यामुळे चाल बदलली की काय? असेही एका व्यक्तीने लिहिले होते. दुसऱ्या एकाने लिहिले –एवढे मुरडत चालायचे होते तर आईचा हात सोडायचा होता. खरं तर, ऐश्वर्या राय बच्चन तिच्या लाडक्या मुलीसोबत अनेक प्रसंगांमध्ये स्पॉट झाली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, आराध्याचा जन्म झाल्यापासून ती सतत माझ्यासोबत फिरत आहे. मी आराध्याला माझ्यासोबत सगळीकडे घेऊन जाते. मी तिच्या वेळापत्रकानुसार आणि शिक्षणानुसार माझे वेळापत्रक जुळवते.

आराध्या, ट्रोल, अभिषेक बच्चन, Abhishek Bachchan, Trollers,  Daughter Aaradhya

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच तो ‘बॉब बिस्वास’ या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वासची भूमिका साकारत आहे. अभिषेकने या व्यक्तिरेखेसाठी अनेक किलो वजन वाढवले ​​आहे, असे म्हटले जाते. शूटिंगदरम्यान त्याचे वजन १०५ किलोपर्यंत वाढले होते, जे त्याने नैसर्गिक पद्धतीने वाढवले ​​आहे.

लग्नाआधी क्रिकेटवीर कपिल देव, या नटीच्या प्रेमात पडला होता. रोमी भाटियाशी त्याने नंतर लग्न केले (kapil Dev Was In Love With This Actress Before Marriage : But After Break-up Tied The knot With Romi Bhatia)