आयुष शर्माच्या बर्थ डे पार्टीत सिताऱ्यांची गर्द...

आयुष शर्माच्या बर्थ डे पार्टीत सिताऱ्यांची गर्दी : शह्नाज गिल वर सगळ्यांच्या नजरा खिळून राहिल्या, तर डेंग्यूच्या आजारातून बरा झालेला सलमान खान छान दिसत होता… (Aayush Sharma’s Birthday Bash: Salman Khan, Kangna Ranaut, Palak Tiwari Pose In Style But Shehnaaz Gill Has Everyone’s Attention, See Pictures)

सलमान खानचा सालेभाई आयुष शर्मा आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करतो आहे. पण त्याने आधल्या दिवशीच एक पार्टी ठेवली. त्यात बॉलिवूडच्या सिताऱ्यांची गर्दी जमली होती. डेंग्यूच्या आजारातून बरा होऊन सलमान खान पहिल्यांदाच लोकांसमोर आला, हे या पार्टीचं वैशिष्ट्य ठरलं. जिन्स आणि टी शर्ट घातलेला सलमान फारच छान दिसत होता. छायाचित्रकारांना पोज देत व हात जोडून हॅपी दिवाळी, अशा शुभेच्छा तो देत होता. लाल ड्रेसमध्ये कंगना रणावत आली. तर सोनाक्षी सिन्हा, चंकी पांडे, पलक तिवारी, अरबाज खान व इतर तारे जमले होते.

मात्र सगळ्यांच्या नजरा खिळून राहिल्या त्या, शहनाज गिलवर. अतिशय छान अशा स्टायलिश ग्रे कोट-पॅन्ट मध्ये ती आली होती. तिने लूज ग्रे पॅन्ट वर ब्लॅक शिअर टॉप आणि त्यावर ग्रे वेस्ट कोट घातला होता. ही सर्व स्टाईल शहनाजला खूपच शोभून दिसत होती. ती एकदम हॉट बेब दिसत होती.

सनाने मिनिमल मेकअप ठेवला होता. गडद काजळ लावले होते. ती फारच सुंदर दिसत होती. तिचं हे रूप वेगाने व्हायरल झाले. सलमानशी संबंधित प्रत्येक समारंभात आजकाल सना दिसते. कारण ‘किसी का भाईजान’ या त्याच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय्‌.

पलक तिवारी पण या चित्रपटात आहे. पलक तिवारी आणि सोनाक्षी सिन्हा पण फारच स्टायलिश आल्या होत्या.