तोंडातल्या तोंडात पुटपुटणाऱ्या अभिनेत्यावर आस्त...

तोंडातल्या तोंडात पुटपुटणाऱ्या अभिनेत्यावर आस्ताद काळेने घेतले तोंडसुख( Aastad Kale Strongly Criticises On Dialogue Delivery Of Leading Actor : Urges Sub-Titles For His Dialogue)

मराठी टीव्ही अभिनेता आस्ताद काळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सध्या तो बाबा जाऊ नकोस दूर तू या मालिकेत दिसत आहे. आस्तादने सोशल मीडियावर नुकतीच केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने एका लोकप्रिय मालिकेतील एका कलाकाराबद्दल स्वत:चे स्पष्ट मत मांडले आहे.

आस्तादने त्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘झी मराठी’वरील एका मालिकेतील एका नटाने साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा. काय बोलतो कळत नाही. ता.क:- मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती, तेव्हा तीमधले एक-दोन प्रसंग भोगले’

आस्तादची ही पोस्ट बरीच व्हायरल झाली आहे. अनेकजण ती मालिका कोणती असा प्रश्न कमेंटमध्ये विचारत आहेत. तर काहींच्या मते आस्तादने या पोस्टमधून तू तेव्हा तशी या मालिकेवर निशाणा साधल्याचे म्हणत आहेत. या मालिकेत नुकतीच अनामिकाचा नवरा आकाशची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते.

आकाश हे पात्र अभिनेता अशोक समर्थ साकारत आहे. पण मालिकेत आकाशचे डायलॉग समजत नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली होती. एका युजरने तर ज्या दिवशी तो कलाकार तोंड उघडून डायलॉग म्हणेल तो दिवस ऐतिहासिक असेल, असे म्हटले आहे. पट्ट्याने मरेस्तोवर मार खाताना संवाद बोलणारा एकमेव कलाकार असे म्हटले. तर आस्तादने त्यावर पट्ट्याचा कलाकार अशी प्रतिक्रिया दिली आहे.