गणेशोत्सवानिमित्त आरती स्पर्धा (Aarti Competiti...

गणेशोत्सवानिमित्त आरती स्पर्धा (Aarti Competition During Ganeshotsav)

गणेशोत्सव निमित्त ‘आरती माझ्या बाप्पाची ‘ यंदाच्या गणेशोत्सवात आरतीची आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शेमारू मराठी बाणा या चॅनल तर्फे’ आरती माझ्या बाप्पाची’ ही स्पर्धा सुरु झाली असून या मध्ये प्रेक्षकांना आपल्या घराच्या बाप्पासोबत फोटो शेअर करायचा आहे. हे फोटो प्रेक्षक  चॅनलच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर  वर पाठवू शकतात. या फोटोत घरच्या गणपतीची केलेली सजावट दाखवू शकता किंवा पारंपरिक मराठी पेहरावात सजलेले संपूर्ण कुटुंब असे दिसायला हवे.

Aarti Competition During Ganeshotsav
Aarti Competition During Ganeshotsav

त्याच प्रमाणे आरतीच्या स्पर्धेत प्रेकक्षकांनी त्यांच्या घरच्या आरतीचे व्हिडिओ पाठवायचे आहेत. निवडक आरत्यांचे व्हिडीओ शेमारू मराठी बाणा चॅनल वरून दाखविण्यात येतील. शिवाय भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

Aarti Competition During Ganeshotsav