‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील नट्टू काक...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील नट्टू काका यांचं निधन… (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Nattu Kaka, Ghanshyam Nayak Passes Away…)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काका ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन झालंय. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालंय.

‘तारक मेहता…’मधील नट्टू काका ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांना गेल्यावर्षी घश्याच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. मात्र शेवटपर्यंत आपण काम करत राहावे, आपल्या चेहऱ्याला मेकअप असावा अशी त्यांची इच्छा होती. अन्‌ त्याप्रमाणे काही प्रमाणात ते या मालिकेशी जोडलेले राहिले. भले ते नेहमी शूटिंगसाठी जाऊ शकत नव्हते, परंतु अधूनमधून त्यांची उपस्थिती असे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Nattu Kaka, Ghanshyam Nayak, Passes Away, death

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली १३ वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे. नट्टू काका हे देखील त्यापैकीच एक पात्र होते. त्यांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांच्या निधनानंतर टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांकडून सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

घनश्याम नायक यांनी टीवी इंडस्ट्री सोबतच चित्रपटांतूनही काम केले होते. त्यांनी बेटा, तिरंगा, आंखें, लाडला, क्रांतिवीर, आंदोलन, बरसात, माफिया, चाहत, इश्क, चाइना गेट, तेरे नाम, खाकी यांसारख्या चित्रपटातून काम केले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.