आमिर खानची लेक आहे डिप्रेशनमध्ये, सोशल मीडियावर...

आमिर खानची लेक आहे डिप्रेशनमध्ये, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती (Aamir Khan’s Daughter Ira Khan Confess That She Is Stressed, Depressed And Exhausted)

कलाकारांसोबतच त्यांची मुले सुद्धा अनेकदा चर्चेत असतात. त्यातील काही स्टार कि़ड इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. तर काहीजण काम करत नसून देखील वेगवेगळ्या कारणांमुळे लाइमलाइटमध्ये असतात.

या स्टार किडमधीलच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक इरा खान. इरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंगसुद्धा बरीच मोठी आहे. दरम्यान इराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केला.

आमिर खानची लेक अनेकदा तिच्या लव्ह लाइफमुळे तसेच फोटोंमुळे चर्चेत असते. बरेचदा ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवते. काही दिवसांपूर्वीच तिने एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने डीप्रेशन बाबत सांगितले.

या पोस्टसोबत इरा खानने लिहिले की, ‘इतक्या कमी वेळात अनेक सामाजिक समारोह झाले. हे मला माझ्या स्टिकर बुकमधल्या एका स्टिकरची आठवण करुन देतात. तणावग्रस्त, उदास पण नीटनेटका दिसणारा असा तो स्टिकर होता. मी पण आता खूप थकली आहे. मला वाटते की मी खरंच काहीतरी चांगले केले आहे. आणि स्वत:चा दर्जा वाढविला आहे. मी खूप चांगले निर्णय घेत होते. कशाचीही पर्वा न करता मी लोकांमध्ये खूप चांगली मिसळले. या सर्व गोष्टी मी हल्लीच शिकले. जे काहींसाठी महत्वाचे असते.

या पोस्टसोबत इराने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. इरा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इराही आमिर खानच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. १९८६ मध्ये आमिरने रीना दत्तासोबत लग्न केले होते. पण १६ वर्षांनी २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.