आमिर खानच्या लाडक्या लेकीचा इराचा साखरपुडा संपन...

आमिर खानच्या लाडक्या लेकीचा इराचा साखरपुडा संपन्न (Aamir Khan’s daughter Ira Khan and Nupur Shikhare got engaged)

आमिर खानची मुलगी इरा खान गेल्या काही वर्षांपासून नुपुर शिखरेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. काही दिवसापूर्वीचं नुपुरनं इराला प्रपोज केलं होतं. दोघांच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनीही या कपलला शुभेच्छा दिल्या होत्या. आता दोघांनी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

इरा आणि नुपुरने नुकताच रितसर साखरपुडा केला आहे. यावेळी इरानं लाल रंगाचा गाऊन आणि नुपुरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघं एकत्र खूपच क्यूट दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड बंधनात अडकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. दोघांचे कुटुंबिय देखील यावेळी हजर होते. आमिर खानची एक्सवाइफ किरण राव आणि आई देखील सोहळ्याला उपस्थित होत्या. सगळेच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होते. आमिर देखील आपल्या मुलीच्या आनंदात सामिल होताना खास ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून दिसला.

इरा आणि नुपुर २०२० पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या नात्याला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. जूनमध्ये दोघांनी आपल्या नात्याची अनिव्हर्सरी देखील साजरी केली.

दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी रोमॅंटिक पोस्ट शेअर करताना दिसतात. अनेकदा दोघांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल होताना दिसतात. दुसऱ्या अॅनीव्हर्सरीला इरानं नुपुरसोबत फोटो शेअर करत लिहिलं होतं,”आमच्या नात्याची २ वर्ष पूर्ण, पण असं वाटतं आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आय लव्ह यू. आशा आहे आपण कायम एकत्र राहू”.

इरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. आता हे दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय.

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर असून आतापर्यंत त्याने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर काही दिवस आमिर खानचा देखील नुपूर फिटनेस ट्रेनर होता.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)