आमीर खानची मुलगी इरा, फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात...

आमीर खानची मुलगी इरा, फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात! (Aamir Khan’s Daughter Ira is Dating Fitness Trainer Nupur Shikhare, She Shares Romantic Photos With Him)

आमीर खानची मुलगी इरा, ही पॉप्युलर स्टार किड्‌सच्या यादीतील एक आहे. सोशल मीडियावर ती नेहमी गाजत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील खूप आहेत. आता पुनःश्च एकवार इरा वादग्रस्त ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं प्रेमप्रकरण! तिचा फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपुर शिखरेशी ती सध्या डेट करते आहे. अन्‌ तिनं सगळ्यांसमोर जाहीर घोषणा केली आहे की, ती आता एकटी राहिलेली नाही.

इरा खानने आपला बॉयफ्रेंड नुपुर शिखरे याच्यासह काढलेले काही जवळीक दाखविणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये या प्रणयी जोडीचे हावभाव बघण्यासारखे आहेत. इरा व तिच्या बॉयफ्रेंडची ही छायाचित्रं चाहत्यांना आवडली आहेत. त्याच्या खाली तो आपला ‘ड्रिम बॉय’ असल्याचं नमूद केलं आहे.

या फोटोंसाठी कॅप्शन्स देताना इराने नुपुरला आपला व्हॅलेंटाईन आणि ड्रिम बॉय असं म्हटलं आहे. या बॉयफ्रेंडसोबत इराने रोमॅन्टीक पोझेस्‌ दिल्या आहेत. एका फोटोत ती मॅचिंग ड्रेसमध्ये दिसते आहे, तर दुसऱ्यात ती नुपुरसह हिरवळीवर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसते आहे.

काही दिवसांपूर्वीच इरा खानने आपले हॉट फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यात बिकिनी घालून तिने काहुर माजविले होते. इराचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला होता व छायाचित्रं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. इराने दोन फोटो टाकले होते, ज्यामध्ये ती पिवळ्या आणि काळ्या तोकड्या कपड्यात दिसली होती. अन्‌ दुसऱ्या एका फोटोत ती गच्चीवरील पोहण्याच्या तलावात डुंबत होती.

अलिकडेच इराने एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, ती डिप्रेशनमध्ये आहे. आई-बाबांच्या घटस्फोटावरून तिनं भाष्य केलं होतं. तसंच आपल्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाचं पण तिनं कथन केलं होतं.

विरोधाभास असा आहे की, इरा खान सिनेमात येऊ इच्छित नाही. दिग्दर्शन क्षेत्रात तिला नशीब काढायचं आहे. दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती खूप मेहनत करते आहे. दरम्यान बॉयफ्रेंड बरोबर काढलेले रोमॅन्टिक फोटो इंटरनेटवर टाकून ती फारच व्हायरल होते आहे. अन्‌ चाहते तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.