आमिर खान कोरोना पॉझिटीव, बॉलीवुडचा मिस्टर परफेक...

आमिर खान कोरोना पॉझिटीव, बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आहे होम क्वारंटीन (Aamir khan tests Corona positive)

मागील काही दिवसांत अनेक सिनेकलाकार कोरोना पॉझिटीव आढळून आले आणि आता बॉलिवूड सुपरस्टार आमीर खानची कोरोना चाचणी सकारात्मक आला आहे. त्यामुळे आमीरने स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे.
बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव आल्यानंतर त्याने स्वतःच वार्ताहरांना याबद्दल कळवले आहे.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम
आमीर खानच्या प्रवक्त्याने याबाबत खुलासा देताना असे म्हटले आहे – ”आमीर खानची कोविड-१९ चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या तो घरीच होम-क्वारंटीनमध्ये आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. त्याची तब्येत सुधारत आहे. अलीकडे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून त्यांची कोविड चाचणी करून घ्यायला हवी, असे आमीरचे सांगणे आहे. तसेच शुभचिंतकांच्या शुभेच्छांसाठी त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत.” 

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम
विशेष म्हणजे मागच्या वर्षी आमीरसोबत काम करणारे सुरक्षा कर्मचारी, ड्रायव्हर आणि घरी काम करणारे नोकर अशा ७ कर्मचाऱ्यांची कोविडची चाचणी सकारात्मक आली होती.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम
अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साली, कार्तिन आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह यांसारख्या बॉलिवूड कलाकारांची करोना चाचणी सकारात्मक आली होती.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा