आमीर खानचा अलविदा!! कारण काय? (Aamir Khan Says ...

आमीर खानचा अलविदा!! कारण काय? (Aamir Khan Says Goodbye to His Social Media Account, Actor Reveals The Reason in His Last Post)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती पावलेल्या आमीर खानने आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाउंटला अलविदा केले आहे. त्याआधी त्याने शेवटची पोस्ट शेअर केली. त्यात त्याने आपल्या तमाम चाहत्यांचे आभार मानले, आणि हा निरोप घेतला आहे.
सगळ्यांना चकित करणारा हा निर्णय, आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला आहे. आपल्या अखेरच्या पोस्टमध्ये तो लिहितो – ”दोस्तहो, वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मला जे प्रेम दिलेत, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझं मन भरून आलं आहे. मात्र सोशल मीडियावर ही माझी शेवटची पोस्ट आहे. तसं पाहिलं तर या प्लॅटफॉर्मवर मी फारसा ॲक्टिव्ह नाही. त्यामुळे त्यापासून लांबच राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. काळजी करू नका, आपण पूर्वी ज्याप्रमाणे एकमेकांशी संवाद साधत होतो, तसाच साधूया.”

Photo Credit: Instagram
आमीर पुढे लिहितो – ”माझ्या एकेपी म्हणजे आमीर खान प्रॉडक्शन्सने स्वतःच अधिकृत चॅनल बनविलं आहे. तेव्हा यापुढे @akppl_official या चॅनलवरून माझ्या चित्रपटांची माहिती तुम्हाला मिळेल.” हाच आमीरचा निरोपाचा संदेश आहे.

Photo Credit: Instagram
सोशल मीडियावरून अलविदा करण्याच्या आधीच ‘लाल सिंह चड्‌ढा’ हा आपला चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आपला फोन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना मोबाईल फोन वारंवार वाजतो, त्यामुळे अभिनयात एकाग्रता करण्यात व्यत्यय येतो, म्हणून त्याने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

Photo Credit: Instagram
या चित्रपटात आमीर सोबत करीना कपूर आहे. शिवाय सलमान व शाहरूख खान एका कॅमिओत दिसतील. अलीकडेच या सिनेमाच्या चौथ्या गाण्यात आमीर सोबत एली अवरामने शूटिंग केले आहे. सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमीर पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय होईल, अशी आशा त्याचे चाहते बाळगून आहेत.