पावसाच्या सरीत आमिर खान व त्याचा मुलगा आझाद यां...

पावसाच्या सरीत आमिर खान व त्याचा मुलगा आझाद यांच्यातला फुटबॉल सामना (Aamir Khan Plays Football With Son Azad Khan In Mumbai Rain, See Viral Video)

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये आमिर खान आपला मुलगा आझादसोबत मुंबईच्या पावसाचा आनंद लुटताना दिसतो. या व्हिडिओमध्ये पावसात एकत्र फुटबॉल खेळताना बाप-लेकाची बॉन्डिंग स्पष्टपणे पाहयला मिळते. आमिरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आमिर खान आणि आझाद पावसात फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.  दोघेही एकमेकांची सोबत किती एन्जॉय करत आहेत, हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते. पावसात फुटबॉल खेळत असताना आझाद आपल्या वडीलांवर भारी पडत आहे, दोघेही एका पार्किंगच्या एका छोट्या जागेत फुटबॉल खेळत आहेत आणि खेळताना पावसाचा आनंद घेत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोघांमध्ये स्कोअरवरून वाद होतो.  आझाद म्हणतो की त्याला 3 गुण मिळाले आहेत तर आमीर म्हणतो की आतापर्यंत फक्त 1 गोल झाला आहे. ‘पाऊस आणि खूप मजा,  आमिर आणि आझादच्या पावसातल्या फुटबॉल सेशनला सुरुवात,असे या व्हिडिओच्या कॅप्शन दिले आहे.

आमिर खानच्या चाहत्यांना त्याला त्याच्या मुलासोबत चांगला वेळ घालवताना पाहून खूप आनंद झाला आहे आणि ते या व्हिडिओमधील बाप-लेकाचे छान बॉन्डिंग एन्जॉय करत आहेत.

 2005 मध्ये आमिर आणि किरण रावचे लग्न झाले होते, आझाद हा आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आहे.  आझादचा जन्म 2011 मध्ये सरोगसी पद्धतीने झाला होता. 2021 मध्ये, किरण आणि आमिरने एकमेकांपासून वेगळे होण्याची निर्णय घेतला होता, मात्र त्यांच्या मुलाला दोन्ही पालकांचे प्रेम मिळावे यासाठी ते अनेकदा एकत्र राहतात.