आमिर खानने हिंदू पंरपरेनुसार केली ऑफिसची पूजा, ...

आमिर खानने हिंदू पंरपरेनुसार केली ऑफिसची पूजा, हातात पूजेचे ताट, डोक्यावर टिळा लावून दिसला अभिनेता (Aamir Khan performs kalash puja as per Hindu ritual, Is seen performing Aarti, Kalash Pooja! Pics goes Viral)

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर आमिर खान थोडा बदलल्यासारखा वाटत आहे. सध्या आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला असून पांढरे केस, मिशा आणि दाढीमध्ये त्याचा वेगळा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. दरम्यान, आमिर खानचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आमिर खान हिंदू परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची माजी पत्नी किरण रावही दिसत आहे.

हे फोटो ‘लाल सिंह चढ्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये आमिर आपल्या आमिर खान प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये पूजा करताना दिसत आहे. त्यांनी ही पूजा हिंदू पद्धतीनुसार केली, फोटोत ते कलशाची पूजा करताना दिसत आहेत. पूजेनंतर ते आरतीही करत आहेत आणि त्याची माजी पत्नी किरण रावही त्यांच्यासोबत आहे.

फोटोंमध्ये आमिर आणि किरण राव एकत्र उभे राहून आरती करताना दिसत आहेत. किरणने आरतीचे ताट हातात घेतले आहे आणि आमिर हात जोडून उभा आहे. एका फोटोत आमिर स्वतः आरती करताना दिसत आहे.

लूकबद्दल बोलायचे झाले तर यावेळी आमिर खान खूप वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. ग्रे लूकमधील केस, दाढी आणि मिशा अशा हटके लूकमध्ये अभिनेता दिसत आहे. पूजेवेळी आमिरने स्वेटशर्ट आणि डेनिम घातली होती. तसेच पूजा करताना आमिरने डोक्यावर नेहरू टोपी आणि गळ्यात गमचा घातला आहे. कपाळावर टिळा असलेला आमिरचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.

ही पूजा आमिर खान प्रॉडक्शनच्या कार्यालयात का ठेवण्यात आली हे अद्वैत चंदनने आपल्या पोस्टमध्ये सांगितले नसले तरी या निमित्ताने सर्वजण आनंदी दिसत आहेत. आमिरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने काही वेळापूर्वीच अभिनयातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. आता दीड वर्षानंतर अभिनय क्षेत्रात परतणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. दरम्यान, तो निर्माता म्हणून पूर्णपणे सक्रिय राहणार आहे.