आमीर खानचं मराठी प्रेम : मराठी चित्रपट करण्याची...

आमीर खानचं मराठी प्रेम : मराठी चित्रपट करण्याची तीव्र इच्छा (Aamir Khan Loves Marathi Language : Passionate To Do A Marathi Film)

कालच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त आमीर खानने एका वृत्तपत्रास खास मुलाखत देऊन आपले मराठी भाषेबाबतचे  प्रेम व्यक्त केले.

मुलाखतीत आमीर खानने कबुल केले की, वयाच्या चाळिशीत प्रवेश केल्यावर मला राजभाषा येत नाही, याचा खेद झाला. तेव्हा अभिनेता मित्र अतुल कुलकर्णी याने आमीरकडे राहुल लिमये या सरांना पाठविले. आमीरच्या घरी लिमये सरांची मराठीची शिकवणी सुरू झाली. चार वर्षे आमीर त्यांच्याकडे मराठी शिकला. लिमये सरांनी मराठी भाषा शिकवत आमीरला मराठीतील प्रतिभावान लेखक, कवी यांच्या साहित्याची ओळख करून दिली.

मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमीरने चिकाटीने मराठी भाषा शिकून घेतली आहे. तो म्हणतो, ‘आज मला मराठीबद्दल इतका आत्मविश्वास आहे की, उत्तम संहिता मिळाली तरी मराठी सिनेमा करण्याची तीव्र इच्छा आहे.’

या मुलाखतीत आमीर खानने असेही म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मला एकदा तरी शिवाजी महाराजांची भूमिका करण्याची तीव्र इच्छा आहे.’