आपल्या सहकलाकारासोबत तिसरं लग्न करण्याच्या तयार...

आपल्या सहकलाकारासोबत तिसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे आमीर खान… (Aamir Khan Is All Set To Get Married For The Third Time With One Of His Past Co-Star…)

आमिर खान त्याची लग्नं आणि घटस्फोट यांमुळे जेवढा चर्चिला गेला तेवढा तो त्याच्या चित्रपटांमुळेही कधी चर्चिला गेला नव्हता. आमीर खान कमालीचा अभिनेता आहे, हे आपण सर्वच जाणतो परंतु, त्याच्या खाजगी आयुष्यामुळे तो बरेचदा ट्रोल होतो. त्याने त्याची दुसरी पत्नी किरण रावला तलाक दिल्यापासून तर नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशानाच साधला आहे.

आमीरने २००५ साली किरणसोबत लग्न केले होते. त्यावेळेस त्याने आपल्या पहिल्या पत्नीस रीनाला तलाक दिला होता. त्यानंतर किरणला तलाक देण्याची घोषणा करून सर्व चाहत्यांना त्याने धक्काच दिला. सोबत सगळ्यांना तोंडसुख घेण्याची संधीही मिळवून दिली. किरण आणि आमीरने तलाक घेताना घोषणाही इतकी जबरदस्त केली होती – त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही वेगळे होत नाही आहोत, तर आमचं पती-पत्नीचं नातं बदलतंय. आता यापुढे आम्ही फक्त मित्र बनून राहणार. एकमेकांच्या कामात सहकार्य करणार. आणि त्यांनी आपलं म्हणणं खरंही करून दाखवलं. तलाकनंतर आमीर आणि किरण त्यांचा मुलगा आजादसोबत आझादपणे हिंडताफिरताना दिसले. तेव्हा देखील लोकांनी, मग तलाक कशाला दिला, असे म्हणून त्याला ट्रोल केले होते.

एवढंच नाही तर किरणसोबत तलाक झाल्यानंतर लगेचच टविटरवर दंगलमधील फातिमा सना शेख ट्रेंड होऊ लागली होती आणि लोकांनी तिला पाहून आता ही आमीरची तिसरी बायको होणार असं म्हणून ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. फातिमा सोबत आमीरच्या रोमान्सच्या चर्चा आधीही झडल्या होत्या. त्यामुळे खरोखर ही त्याची तिसरी बेगम होते की काय असा प्रश्न पडण्यास वाव होता.

परंतु आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर आमीरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आमीर आपला चित्रपट लाल सिंह चड्‌ढाच्या प्रदर्शनानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयीची घोषणा करणार असल्याची सोशल मीडियावर वार्ता आहे. लोक तर असंही म्हणत आहेत की आमीर त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीच थांबला आहे. लग्नाच्या घोषणेमुळे त्याच्यावर टीका होऊ नये आणि त्याचा त्याच्या चित्रपटावर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून तो थांबला आहे, असे लोक म्हणत आहेत. तर दुसरीकडे आपल्या चित्रपटच्या प्रमोशनसाठी आमिरनेच अशा अफवांना प्रोत्साहन दिले असावे, असेही म्हटले जात आहे.

आमिरच्या नववधूबद्दल बोलायचं तर तो त्याच्या आधीच्या चित्रपटातील सहकलाकाराशी अर्थात्‌ त्याच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत सनासोबत लग्न करेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे, कारण या दोघांनी दंगल व्यतिरिक्त ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये एकत्र काम केले होते आणि फातिमालाही आमिर खूप आवडला होता. त्यामुळे लोकांना खात्री आहे. ही बातमी अफवा नसून लवकरच आमिर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे.

आमीरच्या आगामी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्यात आमिर करीना कपूरसोबत दिसणार आहे आणि लग्नाची ही संपूर्ण चर्चा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असू शकते. एंटरटेन्मेंट वेबसाइट बॉलीवूड लाइफच्या मते, सोशल मीडियावर सध्या युजर्स आमिरच्या तिसऱ्या लग्नाची खूप चर्चा करत आहेत

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम