‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांचा हिंदी चित्रपट प...

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांचा हिंदी चित्रपट पाहून आमीर खानचे डोळे पाणावले (Aamir Khan Gets Emotional After Watching Marathi Director’s Hindi Film)

‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अतीव लोकप्रियता मिळवलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. याचा एक खास खेळ आमीर खानने पाहिला. तो बघून आमीर खान अतिशय प्रभावित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले.

‘झुंड’ मध्ये महानायक अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका आहे. चित्रपट पाहून होताच आमीर खानने उभे राहून टाळ्या वाजविल्या. अन्‌ नागराज मंजुळे यांची खूप प्रशंसा केली.

आमीर खान म्हणाला, ‘चित्रपटाच्या आत्म्याला ज्या प्रकारे दिग्दर्शकाने हात घातला आहे, तो असामान्य आहे. हे लॉजिक वापरून जमत नाही. तो असंही म्हणाला की, या चित्रपटाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. अमिताभ बच्चन साहेबांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा नक्कीच एक आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुंदर चित्रपटात कामे केली असली तरी हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो, त्याचा फूटबॉल बनला आहे.’ ‘झुंड’ मध्ये अमिताभजी फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका करत आहेत. खालच्या थरात राहणाऱ्या तरुण मुलांना गुन्हेगारी जीवन जगावे लागत होते. पण फूटबॉलचा खेळ त्यांचे जीवन आणि विचारधारा कसा बदलतो, हे या चित्रपटात दाखवलं आहे.

(फोटो /व्हिडिओ सौजन्य – यु ट्यूब / इन्स्टाग्राम)