आमिर खानने रणबीर कपूरला दिला होता मोलाचा सल्ला ...

आमिर खानने रणबीर कपूरला दिला होता मोलाचा सल्ला : तो न ऐकल्याचा होतोय् त्याला पश्चाताप (Aamir Khan Gave This Special Advice To Ranbir Kapoor, Which The Actor Regrets Not Following)

रणबीर कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. अभिनयात यशस्वी झालेल्या रणबीर कपूरने आपल्या आयुष्यात अनेक लोकांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत आणि त्याने त्याला सांगितलेल्या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. पण आमिर खानने दिलेल्या एका खास सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे आज रणबीरला चांगलेच महागात पडले आहे. मिस्टर परफेक्शनिस्टने रणबीरला असे काय सांगितले की जे न ऐकल्याचा रणबीरला पश्चाताप होतोय. जाणून घेऊया.

सर्वांना माहीत आहे की रणबीर चित्रपटाच्या शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर सुट्टीत फिरायला जातो, परंतु त्यात तो फारसा आनंदी नाही. हे त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे. यावरून सुपरस्टार आमिर खानने त्याला मोलाचा सल्लाही दिला होता. रणबीर कपूरने सांगितले की, आमिरने त्याला त्याची कारकीर्द संपण्यापूर्वी भारतात फिरण्याचा सल्ला दिला होता. आमिरने सांगितले की ‘ऐक, तुम्ही या कुटुंबातून आलात तर तुमची एक खास जीवनशैली असेल. मी तुम्हाला जे सांगतोय त्याचा गांभीर्याने विचार करा कारण तुम्हाला पुढे ही संधी मिळेल अथवा न मिळेल. तेव्हा तुमची बॅग पॅक करा आणि भारतभर भरपूर प्रवास करा. विविध संस्कृती पाहा, लोकांना भेटा आणि हे करण्यासाठी ट्रेन किंवा बसने जा, जेणेकरून तुम्हाला तुमचा देश समजेल. लोक कसे जगतात आणि त्यांना कोणत्या प्रकारचे चित्रपट पहायचे आहेत ते जाऊन पाहा.

रणबीरने सांगितले की, तो त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने भारतात फिरतोय खरा, पण आमिर खानने सांगितल्याप्रमाणे तो फिरत नाही, याची त्याला खंत आहे. रणबीरच्या म्हणण्यानुसार, त्याला असे वाटते की जर मी असे केले तर माझी क्रिएटिव्हिटी वाढली असती.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या लग्नाच्या ३ महिन्यांनंतरच त्यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आलियाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली आहे. या जोडप्याने ५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर यावर्षी १४ एप्रिल रोजी लग्न केले.

रणबीर कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ‘रॉकस्टार’, ‘संजू’ हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरले आहेत. रणबीर कपूर शेवटचा ‘संजू’ चित्रपटात दिसला होता आणि अनेक वर्षांनी त्याचे पुनरागमन ‘शमशेरा’ या चित्रपटाद्वारे होत आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)