आमीर खानने किरण रावसोबत साजरा केला आजादचा वाढदि...

आमीर खानने किरण रावसोबत साजरा केला आजादचा वाढदिवस (Aamir Khan Celebrates Son Azad’s Birthday With Ex-Wife Kiran Rao)

आमिर खान आणि किरण राव यांनी, घटस्फोट झाला असला तरी कामाच्या निमित्ताने वा कौटुंबिक कारणांसाठी एकत्र यायचे, असे ठरवल्याप्रमाणे ही उभयता आपल्या लेकाचा अर्थात आजादचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेले दिसले. दोघांनी एकत्रितपणे आजादचा जन्मदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.

शोभा डे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. शोभाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय – सुंदर संध्याकाळ, अतिशय लज्जतदार घरच्या खाण्यासोबत….

या बर्थडे पार्टीमध्ये आमीर खानचा मोठा मुलगा जुनैद देखील दिसला. जुनैद हा आमीर आणि रीनाचा मुलगा आहे. २००५ साली आमीरने रीनाला घटस्फोट देऊन किरणसोबत लग्न केले होते. त्यानंतर आता आमीर आणि किरणचादेखील घटस्फोट झालेला आहे. अन्‌ या दोघांचा मुलगा आजाद १० वर्षांचा झाला आहे. त्यासाठीच्या या सोहळ्यात कुटुंबिय एकत्र आलेले दिसत आहेत. या पार्टीत आमीरने ब्लॅक टी शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती, आमीरचा हा लूक लोकांना खूपच आवडत आहे.

जुनैदही जिन्स आणि टीशर्टमध्ये दिसतोय. आजादने ब्लू कलरचे टीशर्ट घातले होते आणि किरणने ग्रे कलरचे टीशर्ट व जिन्स घातली होती. आजादने आपल्या मम्मी-पप्पांसोबत केक कापला. एका फॅमिली फोटोमध्ये त्यांच्यासोबत शोभा डे देखील ब्लॅक सूटमध्ये दिसली.  

आमीर खानचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा पुढच्या वर्षी १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. लोकं या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कदाचित आमीर स्वतःच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करेल असे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर याचा काही परिणाम होऊ नये म्हणून सध्या तो गप्प बसला आहे.