बालपणीच्या आठवणीत भावूक झाला आमिर खान : कुटुंब...

बालपणीच्या आठवणीत भावूक झाला आमिर खान : कुटुंब कर्जबाजारी झाल्यामुळे शाळेची फी भरता आली नव्हती… (Aamir Khan breaks down as he recalls not having money for school fee due to his family debts)

आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत असली तरी त्याने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु ठेवले आहे. चित्रपटाला सगळीकडून विरोध होत असल्यामुळे या चित्रपटाच्या यशाबद्दल आमिर चिंतेत आहे. त्यामुळे तो प्रमोशन करण्याची कोणतीच कसर मागे सोडत नाही. तो सतत मीडियाला मुलाखती देत ​​आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आमिरला आपल्या बालपणीचे दिवस आठवले व तो भावूक झाला. आमिर लहान असताना त्याचे कुटुंब कर्जबाजारी झाली होते. त्यांच्याकडे शाळेची फी भरण्याइतपतही पैसे नव्हते. त्यामुळे त्याला अपमान सहन करावा लागला होता.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान त्याच्या बालपणातील काही गोष्टी आठवून भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या मुलाखतीत त्याला तो काळ आठवला जेव्हा त्यांचे कुटुंब 8 वर्षे कर्जबाजारी झाले होते. त्यावेळी अमीरच्या शाळेत सहावीच्या वर्गाची फी सहा रुपये, सातवीची सात आणि आठवीची आठ रुपये असायची, पण त्याच्या वडिलांकडे मुलांची फी भरण्याइतके पैसे नव्हते.

आमिरने सांगितले की, माझ्या वडिलांकडे पैसे नसल्यामुळे माझी आणि माझ्या  भावंडांची शाळेची फी भरण्यास बराच उशीर व्हायचा. एकदा त्याला तीन-चार वेळा फी भरण्याची ताकीद दिली होती. मात्र त्यांना ती भरता आली नाही. त्यानंतर शाळेच्या मुख्यध्यापकांनी याबद्दल शाळेच्या सभागृहात सर्वांदेखत मला फी भरण्यासाठी सांगितले. त्यामुळे मला खूपच लाज वाटली होती. मुलाखतीत तो प्रसंग आठवून आमिरचे अश्रू अनावर झाले होते.

आमिरची कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. तो चित्रपट निर्माता ताहिर हुसैन यांचा मुलगा आहे. असे असूनही त्याला बालपणी अनेक वाईट दिवसांचा सामना करावा लागला होता. पण पुढे आपल्या अभिनय कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या तो बॉलिवूडमधल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

आमिरच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाविषयी बोलायचे तर, आमिर चार वर्षांनी या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर आणि नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.