मुलगी झाली हो! आलिया भट्टच्या पोटी कन्यारत्न जन...

मुलगी झाली हो! आलिया भट्टच्या पोटी कन्यारत्न जन्मले (Aalia Bhatt and Ranbir Kapoor Became The Parents Of Baby Girl)

गेले काही महिने आलियाच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता लागली होती ती आता संपली आहे. आलियाने आपल्या गरोदरपणाची घोषणा केल्यापासून संपूर्ण भट्ट आणि कपूर कुटुंबातील व्यक्ती आनंदी होते. आलियाच्या चाहत्यांना सुध्दा या बातमीने खूप आनंद झाला होता.रणबीर आलियाच्या कुटुंबाची आणि चाहत्यांची उत्सुकता आता संपली असून आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी आलियाला मुलगी झाल्याचे बोलले जाते. आज सकाळीच तिला प्रसूतीसाठी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हापासुन आलियाच्या प्रसुतीची सर्वत्र चर्चा सुरू होती. आलिया आणि रणबीर आईबाबा झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आलिया आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिलला लग्न केले होते. त्यानंतर २ महिन्यांनी आलियाने आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती.