फक्त २ पात्रांनी तारून नेलेला थरारपट, ओटीटी मंच...

फक्त २ पात्रांनी तारून नेलेला थरारपट, ओटीटी मंचावर (A Thriller On OTT Has Only 2 Characters)

ओटीटी मंचावर वेगवेगळे विषय आढळून येत आहेत. ऍमेझोन मिनी टी. व्ही. वर अशाच एका नाविन्यपूर्ण विषयाने प्रेक्षकांना रिझविले.
‘यात्री कृपया ध्यान दे’ नावाचा हा थरारपट फक्त २ पात्रांचा आहे. सुमीत आणि नंदिता ही दोन पात्रे व एक मोटारकार यांच्या प्रवासावर हा चित्रपट आघारलेला असून टेलिव्हिजनचा लोकप्रिय कलाकार शाहीर शेख आणि ‘मकडी’, ‘इकबाल’ या चित्रपटांमधून चमकलेली अभिनेत्री श्वेता बासु प्रसाद यांनी या भूमिका साकार केल्या आहेत.

श्वेताचे बोल्ड लूक आणि थरारक कथन याच्याने हा चित्रपट उत्कंठावर्धक झाला आहे. नायक सुमीत आपल्या कार मधून घरी चालला असतो. रस्त्यात त्याला नंदिता (श्वेता प्रसाद) भेटते. आपल्या भुताने पछाडलेल्या घराबद्दल नंदिनी, सुमीतकडे बोलते अन एकामागून एक धक्कादायक, भयचकीत करणाऱ्या घटनांची मालिका सुरु होते. कथेचा शेवट मोठया कलाटणीने होतो.