प्रभू रामचंद्रांच्या ५ हजार किलो मीटर वाटचालीचे...

प्रभू रामचंद्रांच्या ५ हजार किलो मीटर वाटचालीचे गूढ उलगडणारी मालिका (A Serial To Unfold The Mysterious Travel Of 5000 Kms. By Lord Ram)

तुम्हाला माहिती आहे का श्रीरामांना एक मोठी बहीण होती? कैकेयीने श्रीरामांना १४ वर्षांच्याच वनवासासाठी का पाठवले? नाशिक शहराला ते नाव कसे मिळाले? श्रीराम आणि गौतम बुद्ध ह्यांना जोडणारा समान धागा तुम्हाला माहिती आहे का? अनेक शतकांपासून, रामायणाने भारतातील सर्वांत नावाजलेला ग्रंथ – इतिहास म्हणून मान्यता मिळवली आहे. संपूर्ण देशाच्या जनमानसाला त्याने आकार दिला आहे. परंतु, आपल्या संस्कृतीत इतके खोलवर रुजलेले असूनही, रामायणाबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या लोकांना फार माहिती नाहीत. पवित्र राम नवमीच्या निमित्ताने डिस्कव्हरी+ लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष मध्ये जगातील महानतम कथांपैकी एक असलेल्या ह्या कथेच्या पवित्र भौगोलिक वाटचालीला उजाळा देण्यात येणार आहे. ही रोचक डॉक्युमेंटरी सर्वोत्तम लेखकांपैकी एक आणि डिप्लोमॅट अमिष त्रिपाठी ह्यांच्याद्वारे सांगितली जाईल. खिळवून ठेवणाऱ्या दृश्यांची रेलचेल आणि विशिष्ट कहाण्यांसह ही मालिका वाईड अँगल फिल्म्सची प्रस्तुती आहे. डिस्कव्हरी+ वर ७ एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या ह्या मालिकेमध्ये श्रीरामाच्या थरारक अयानाचे (वाटचालीचे) गूढ उलगडले गेले आहे.

पहिल्यांदाच डिजिटल जगतात येत असलेल्या अमिष त्रिपाठी यांच्या ह्या थरारक तीन भागांच्या असाधारण मालिकेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या ५००० किलोमीटर अंतरावरील प्रवासाचा समावेश आहे, यात रामायणाशी निगडीत प्राचीन कथा आणि कहाण्यांचा धांडोळा आहे, जो आजवर घेतला गेला नव्हता. अतिशय अचूक मांडणीसह अमिष त्रिपाठी हजारो वर्षांपासून भारताला व जवळच्या देशांना प्रेरणा देणाऱ्या, श्रद्धा, तत्त्वज्ञान व जीवनशैली देणाऱ्या रामायणाभोवती असलेल्या रहस्यमय माहितीचे अन्वेषण करतील. शिवा त्रिमूर्ती आणि रामचंद्र मालिकेच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या व भारतीय प्रकाशन इतिहासामधील ह्या सर्वाधिक वेगाने व दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांचे लेखक अमिष ह्यांची स्क्रीनवर कहाणी सांगतानाची उपस्थिती निश्चितच दर्शकांना खिळवून ठेवेल.

त्यांच्या ह्या प्रवासामध्ये यतींद्र मिश्र (अयोध्याचे राजपूत्र), कविता काणे (लेखिका), पुरस्कार विजेते जल- भूगोलशास्त्रज्ञ रितेश आर्या, सुनेला जयवर्देने (परावरण वास्तुविशारद व लेखिका), कृष्ण देवराया, विजयनगर साम्राज्याचे वंशज, शशी धनतुंगे, श्रीलंकन सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीचे माजी अध्यक्ष आणि इतर अनेक त्यांच्यासोबत असतील जे ह्या मालिकेची विश्वसनीयता वाढवतील. भूगर्भशास्त्र, रिती- रिवाज आणि मान्यतांचा मागोवा घेताना अमिष भारत आणि श्रीलंकेतील मुख्य ठिकाणी प्रवास करतील आणि इतिहासाला जिवंत करून समृद्ध संस्कृती, सामाजिक विविधता व प्रत्येक ठिकाणी प्रचलित असलेल्या परिसरांना समोर ठेवतील. पुरस्कार विजेते प्रॉडक्शन हाऊस वाईड अँगल फिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका सुजाता कुलश्रेष्ठ आणि अभिमन्यु तिवारी ह्यांनी सह- दिग्दर्शित केली आहे.