संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचा...

संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचा झाला साखरपुडा : सोशल मिडीयावर स्वतः तिनेच दिली ही गोड बातमी (A.R. Raheman’s Daughter Khatija Rehman Gets Engaged)

संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचा साखरपुडा झाला. तिनं  स्वतःच सोशल मिडीयावर, आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे फोटो टाकून, ही गोड बातमी जाहीर केली आहे.

रियासदीन शेख महम्मद याच्याशी खतीजाचे लग्न होणार आहे. तो साउंड इंजिनिअर आहे. आपल्या वाढदिवशी, म्हणजे २९ डिसेंबरला खतीजाने या तरुणाशी साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे निकटचे मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते.
खतीजाने या प्रसंगी पिंक कलरचा ड्रेस घातला असून त्यावर मॅचिंग मास्क परिधान केला आहे. रियासदीनचे छायाचित्र मात्र ब्लॅक अँड व्हाईट आहे.

काही महिन्यांपूर्वी खतीजा चर्चेत आली होती. कारण लेखिका तस्लिमा नसरीन यांनी तिला ट्रोल केले होते. ‘मी सुशिक्षित तरुणींना बुरखा घातलेला पहाटे, तेव्हा माझी घुसमट होते’ असे तस्लीमाने लिहिले होते. त्यावर खतीजाने प्रत्युत्तर दिले होते की, ‘माझे कपडे बघून तुम्हाला घुसमट होत असेल तर मोकळ्या जागेत जाऊन हवा खा. मला माझ्या कपडयात घुसमट होत नाही. उलट अभिमान वाटतो.’
ए. आर. रहमानने देखील मुलीची कड घेत म्हटलं होतं की, ‘काय कपडे घालायचे ही तिची वैयक्तिक आवड आहे.’