सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल (A Non-...
सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल (A Non-Bailable Warrant Issued Against Sonakshi Sinha In A Fraud Case)

By Deepak Khedekar in मनोरंजन
सोनाक्षी सिन्हावर फसवणुकाची गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
न्यूज पोर्टल वरून मिळालेल्या वृत्तानुसार मोरादाबाद येथे राहणाऱ्या प्रमोद शर्मा नामक कार्यक्रम आयोजकाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावण्यासाठी तिला ३७ लाख रुपये देण्यात आले. परंतु सोनाक्षी त्या कार्यक्रमास गेली नाही, म्हणून शर्मा यांनी पैसे परत मागितले.

हे पैसे परत देण्यास सोनाक्षीच्या मॅनेजरने नकार दिला. म्हणून त्याने थेट सोनाक्षीशी संपर्क साधला. अनेक वेळा संपर्क करूनही तिने दाद न दिल्याने शर्मा यांनी तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार गुदरली.

आपले निवेदन देण्यास सोनाक्षी एकदाच मोरादाबादला गेली. पण नंतर अनेकदा ती गैरहजर राहिल्याने कोर्टाने तिच्यावर वॉरंट जारी केले आहे.